करियर च्या संधी, नवे नवे छंद चिमणीला म्हणायचे
" चिऊताई चिऊताई, दार उघड "
चिमणी म्हणायची " थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते"
मित्रमैत्रिणी, नवे नाटक- सिनेमा चिमणीला साद घालायचे,
पण तिचं आपलं एकच ऊत्तर,
" थांब माझ्या बाळाला तीट लावते"
" थांब माझ्या पिल्लाला झोपवते !"
आता पिल्लू उड़ालं भूर्र..... पार परदेशी....
पैसे पाठवी, पण चिऊ झाली मायेची उपाशी !
आता चिऊ वाट बघतेय् दार ठोठावल्याची....
बाई ग, चिऊताई, आता तुलाच कास धरायला हवी,
जुन्या सोबत्यांची, अन् नव्या छंदांची.
अग, पिल्लं घेणारच भरारी, नव्या आकाशी
पण तू स्वतःच दूर कर तुझी उदासी,...
आणि कर गट्टी नव्या आयुष्याशी,
आणि मुख्य म्हणजे "स्वतःशी " !
तरच होईल ही जुनी कहाणी "सुफळ संपूर्ण"अशी !
-✍सुजाता
Tuesday, March 20, 2018
चिऊताई.....
चिऊताई
चिऊताई चिऊताई दार उघड.....
करियर च्या संधी दार ठोठावतायत,....
नव-याचा ङब्बा, मुलांचा नाश्ता
किती काळ करणार ....?
अग चिऊताई, दार ऊघङ.....
एकटीनेच पाहूणचार, कुळधर्म सांभाळणार ?
दाबून टाकलेले छंद साद घालताहेत....
चिऊताई चिऊताई आता तरी दार उघड !
दारावरची टकटक बंद होईल,...
घरातलेही आपापल्या जगात व्यस्त होतील....
एकटीच मग तू कुढत बसशील....
चिऊताई वेळीच दार उघड.....
कोंङलेला श्वास मोकळा कर,
ऊंच आकाशात भरारी घे,
चिऊताई चिऊताई दार उघड,
आणि आता स्वतःसाठी जग !!
--✍ सुजाता
Subscribe to:
Posts (Atom)
