Monday, July 26, 2021

आठवणी

आठवणीं.....
भूतकाळातल्या आठवणींनी भारी छळलं,
तेव्हा मी त्यांना तिलांजली द्यायचं ठरवलं.
मन घट्ट करून आठवणींना सरणावर चढवलं,
सरळ मी काडीनी, पेटवूनच दिलं ।
आठवणी जळताना मात्र नवलच घडलं....
एकेका आठवणी चं फुलपाखरू बनलं !
आता मी आनंदी विचारांची फुलवली फुलं,
आठवणींच्या फुलपाखरांनी, आयुष्याचं नंदनवन केलं,
आयुष्याचं नंदनवन केलं....!!
✍️ - सुजाता 🦋🦋

Thursday, July 8, 2021

उडायचं आहे....

घरटी बांधण्यात एवढी गुंग झाले, की उडण्यासाठी पंख होते हे ही विसरले....
खूप खेळून झाली भातुकली,
आता उंच उडायचे आहे......
स्वप्न विणण्यातच आयुष्य संपलं, 
आता खरोखरीचं जगायचं आहे....!!
✍️ सुजाता