Monday, August 31, 2020

विसर्जन

कळलंय् आता मला, "विसर्जनाचं" कारण.....
का राहतो बाप्पा, थोडेच दिवस, अन् का करावं त्याचं विसर्जन....
एखाद्याच्या येण्याची उत्सुकता, वास्तव्याची मौज,
जातानाची हुरहुर,आणि पुन्हा येण्याबद्दलची आण
हे सारं, शिकवून जातं आपल्याला आयुष्याचं तत्वज्ञान !
सुख असलं 'अल्पायुषी' तरी, करावं साजरं, छान..
आणि पुढे पुढे उलटतच रहावं, आयुष्याचं पान....!
✍ सुजाता

विसर्जन

गणेशाचं कसलं आगमन, 
आणि कसलं विसर्जन....
तो तर स्वयंभू....अनादी...
अनंत... सचेतन !
आवाहन करुया सद्भावनेचं, 
अन् षङ्रिपूंचं विसर्जन,
मग आयुष्य बनेल महोत्सव,
अन् भंवताल बनेल नंदनवन !!
✍ सुजाता.

Sunday, August 30, 2020

miracle


it was there, in front of her...
a Blank Paper -a White Canvas
she had Brush,
and Colours, of her Feelings,
a Pen, too, of her Thoughts 
but she didn't have Power,
or Confidence
to Express anything.....!
but then, suddenly, a Miracle happened,
through Bhagawad Geeta or Osho's 'Sayings'
through Meditation....
or Selp- help Techniques....
she got her Confidence.
she got Wings....!
and then....
she started Writing....
Non - stop, Non- tiring.... 
colours got downloaded on Canvas....
and 
she Crafted a Stucture....
very Beautiful.... Divine....
Miraculous....Marvoulous....!
Exactly like....
God had Crafted her....

✍️ sujata.

ती.....

तिच्या समोर होता,
पांढराशुभ्र कागद.... कोरा Canvas....
ब्रश होता तिच्याजवळ, 
आणि रंगही, - - - तिच्या भावनांचे,
पेनही होतं, 
आणि शब्दही, - तिच्याच विचारांचे.
पण नव्हतं बळ, किंवा आत्मविश्वास,
त्या कागदावर काही उमटवणयाचा !
पण मग, अचानक एक जादू झाली,....
ओशोंच्या वचनांची,..... Meditationची,.... किंवा 
Selp- help Techniquesची.....
तिला गवसला तिचा Confidence....
आणि मग झरझरू लागली 
तिची लेखणी,... अथक.... अविश्रांत...
रंग उतरू लागले, canvasवर झपाझप
आणि साकारलं गेलं एक शिल्प....!
सुंदर...... अद्भूत....!
अगदी तस्संच.....
तसं साकारलं होतं देवानी,....
तिच्या रूपात....!!!
✍️ सुजाता.

Saturday, August 29, 2020

आहिस्ता चल ऐ जिंदगी

आहिस्ता चल, ऐ जिंदगी,
अभी मुस्कुराना बाक़ी हैं ....
कईं गीत सुनना बाकी हैं,
कईं ख्बाब बुनना बाक़ी हैं ।
मंजिल तो मिलेगी जरूर....
सफ़र एन्जॉय करना भी जरूरी है ।
पतझड़ हो, या बहार....
हर हालमें खूष रहना जरूरी है ।
✍️ सुजाता

श्रावण

आत्ता होतं, लख्खं ऊन, 
अवचित् आली पावसाची सर....
कधी सुख कधी दुःख,
जशी फिरे निसर्गाची लहर....
ऊन-पाऊस, सुखदुःखाचा
 पाठशिवणीचा खेळ,
सारे सारे क्षणभंगूर, 
कसा लावावा 'मेळ'....!!
✍ सुजाता.

Connect

connect होता आलं पाहिजे,.....
निसर्गाशी,..... फुलांच्या हळूवार स्पर्शाशी, 
वाऱ्यावरून येणाऱ्या धुंद गंधाशी,
उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांशी
अन् हो, कोसळणाऱ्या जलधारांशी...!
Connect होता आलं पाहिजे,
भुकेजलेल्या भिकाऱ्याशी,
गरीब पण स्वाभिमानी विद्यार्थ्याशी,
आणि दुखावलेल्या एकाकी स्त्रीशीही...
Connect होता आलं पाहिजे,
एखाद्या जखमी जनावराशी सुद्धा...
तरच Connect होऊ आपण,
त्या सर्वशक्तिमान जगन्नियंत्याशी....!
✍️ सुजाता

मीच माझा सखा

हे बरे झाले, देवा, दिला अंधार तू इतका मला....
वाट माझी शोधावया, झालो मी स्वतः दिवा...!
काटेरी वाटेवरूनी मी, चाललो एकटा असा....
स्वतःच बनलो ऊर्जा, अन् झालो मी माझा सखा !
✍ सुजाता

Good, i was lost in the middle of Darkness, alone....
I could BE my own Light !
I got the strength to Fight !
Singing my own Song in the Starry night....
Keeping all the worries, out of sight.
Confident to win the War like a Knight.
Flowing with the wind, enjoying my Flight....!!
✍ sujata

slow death

धीमं मरण !.....Slow मृत्यू !
अशीच कधीतरी अंधारात बसले असताना,
मी चाचपडते,
माझी सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे,
की मेलीए....
गरीब बिचाऱ्या भाजीवालीशी मी जेव्हा घासाघीस करते,
भरपेट जेवल्यानंतर, एखाद्या भुकेल्या भिकाऱ्याला दुर्लक्षून जेव्हा मी पुढे जाते,
पेपरमधल्या रेपच्या,खूनाच्या किंवा आत्महत्येच्या बातम्या वाचून, हळहळण्याऐवजी,
जेव्हा मी हळूच सुस्कारा सोडते, की त्यात "माझं" कोणी नै,....
तेव्हा तेव्हा, माझी सद्सद्विवेकबुद्धी 
कणाकणाने मरतच तर असते....
माझ्या AC कारमध्ये असताना, मी जेव्हा रस्ता ओलांडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करते,
किंवा शक्य असूनही Car Pooling टाळते,
देशातील भ्रष्टाचारावर जेव्हा निर्विकार पणे राजकारण्यांना दोष देते,
अश्याच आणखी बऱ्याच वेळा, आपला काही संबंध नसल्यासरखी वागते,
तेव्हा तेव्हा माझी सद्सद्विवेकबुद्धी कणाकणाने मरतच असते,
नव्हे, मीच तिला मारत असते....!
✍️ सुजाता

स्वसंवाद

खूप बोलले आजवर.... 
आता " ऐकणं " शिकतेय् ....
वाद घातले इतरांबरोबर, आता
स्वतःशी  "संवाद"  साधतेय्.
मी React करते, का Respond,
त्रयस्थ होऊन "जोखतेय्" .....
खूप नमूने बघितले आतापर्यंत, आता
स्वतःतच "डोकावून बघतेय्... !!
✍ सुजाता.

Friday, August 28, 2020

श्वास

" श्वास "

" श्वासावर लक्ष केंद्रित करा " योगा टीचरनी सांगितलं, आणि माझं लक्ष, श्वासाऐवजी "श्वास"
या शब्दावरच केंदित झालं....
"श्वास" ! जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला अखंड सोबत करणारा, rather, ज्याची सोबत संपल्यावरच मरण येतं, असा, "श्वास" !
जन्मणा-या बाळाने पहिलं "टॅ हॅ" केलं नाही, म्हणजेच श्वास घेतला नाही, तर मोठयातला मोठा Gynecologist सुद्धा पालकांइतकाच धास्तावतो. असा हा श्वास.
असं म्हणतात की माणसाचं आयुष्य हे, वर्ष- महिने यांत न मोजता "अमूक इतके श्वास" असं मोजतात ! म्हणूनतर श्वास रोखून किंवा दीर्घश्वसन करून - श्वास slow करून, योगी आपलं आयुष्यमान वाढवतात.
आपण धावत आलो, किंवा रागावलो, की आपले श्वासोछ्वास जलद होतात, म्हणूनतर १०० आकडे मोजून श्वासावर काबू ठेवायला सांगतात. शवासनात तर आपला श्वास चालू आहे, हे आपल्या स्वतःला सुद्धा जाणवत नाही.
खरंतर अव्याहतपणे, काहीही श्रम न करता, आपल्या ही नकळत, आपला श्वास चालू असतो.
मनुष्य आणि प्राणीच नव्हे, तर वनस्पती सुद्धा श्वासोछ्वास करतात, आणि जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असा प्राणवायू निर्माण करतात., ज्यामुळेच केवळ आपण जिवंत रहातो !
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या श्वासाशिवाय आपण जगू शकणार नाही, तो आपण आयुष्यभर अगदी Free, एकही पैसा खर्च न करता, घेत असतो. जीवन म्हणजे " पाणी" सुद्धा आजकाल विकत घ्यावं लागतंय्, हो कीनई.....?
✍ सुजाता.

स्वतः साठी

प्रेम-त्याग-समर्पण, 
सारं असतं स्वतः साठी,
आपण मात्र आव आणतो,
'कर्म' माझी किती मोठी !
पुण्य करा, नाहीतर पापाचा 
ब्रम्हराक्षस येईल भित्यापाठी !
सहृदयतेनी वागलं नाही, 
तर बसत जातात नात्यामध्ये गाठी,
नामसमरण करतानाही भिती दाखवते,
परमेश्वराची अदृष्य लाठी !
म्हणून म्हणते, आपण जगतो,
फक्त आणि फक्त स्वतः साठी....
कशाला मानायचं मग,
मुलांना म्हातारपणाची काठी....?!!
✍ सुजाता.

वाचू आनंदे.... Let's Read with Pleasure ! my YouTube Channel

https://www.youtube.com/user/sujatamoghe

जाग

आनंदी रहाण्याची सुरवात कुठच्याही दिवसापासून करता येते, 
फक्त तुम्हाला 'जाग' यावी लागते ......
आणि तुमच्यात ती 'आग' असावी लागते. ...
लोकांच्या तक्रारींचं आणि अपेक्षांचं ओझं 
झुगारून देण्याची हिंमत असावी लागते !
एकदा का ते झुगारून दिलं, की आपण 
पिसासारखे हलके होतो...
आणि स्वतःतच रमतो  !
मग आयुष्य खूप सुंदर होत जातं.....
-- ✍सुजाता

"स्पर्श"

 स्पर्श

"स्पर्श " म्हटलं, की पहील्यांदा आठवतो, तो आईचा स्पर्श - मायेचा ! आई- बाबांचा, ताई- दादाचा, प्रेमाचा स्पर्श. बोलणंही अवगत व्हायच्या आधी, बाळाला दुस-यांशी connect करणारा तो स्पर्श....

मग, जसजसं मूल मोठ होऊ लागतं, तसतसं त्याला इतर स्पर्शही जाणवू लागतात. रागाचा स्पर्श, ढकलण्याचा - नाकारण्याचा स्पर्श..

आणि वयात येणा-या मुलींना, हल्ली तर मुलांनाही, एक नवीनच स्पर्श अनुभवायला येऊ लागतो -- किळसवाणा, नकोसा वाटणारा, घृणा उत्पन्न करणारा स्पर्श....! मग ट्रेनिंग मिळतं, ते प्रत्यूत्तर करणा-या स्पर्शाचं ! "No" म्हणणारा, नकार देणारा, ठाम ! तो पण स्पर्शच !

पुढे, वय वाढलं, की हवाहवासा वाटणारा स्पर्श, नवथर तारुण्याचा....नवीनच जगात घेऊन जाणारा, स्वप्नाळू, तरीही आश्वासक, असा स्पर्श.

नंतर मिळतो, तो द्यावा - घ्यावा, असा, आधाराचा स्पर्श. साथ देणारा, धीर देणारा... शाब्बासकी देणारा स्पर्श ! 'तू पुढे हो, मी तुझ्या पाठीशी आहे,' असा, मनोबळ वाढविणारा, पाठीवर थाप देणारा, आत्मविश्वास वाढवणारा, स्पर्श !

म्हातारपणीचा थरथरत्या हातांनी आशिर्वाद देणारा स्पर्श....आणि त्या सुरकुतलेल्या हातांनी आधार देणारा, सावरणारा, एक तारूण्याचा स्पर्श.....!

पण सर्वांत शेवटी होतो, तो अटळ असा स्पर्श, मृत्यूचा ! आणि त्या प्रियजनाच्या थंङगार, चेतनाहीन हाताला केलेला स्पर्श.... अंगावर शहारे आणणारा....!

पण, या सर्वांच्या ही वर, जन्मापासून मृत्यूपर्यंत पुरणारा, "त्या" अदृश्य शक्तीचा, देवाचा स्पर्श.... जो फक्त जाणवतो, कधी 

वा-याच्या झुळूकीतून, तर कधी पांवसाच्या धारांतून,.....त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचा स्पर्श.....जो जाणवतो सर्व सुख दुःखाच्या प्रसंगांत.....

✍ सुजाता.