Wednesday, July 27, 2022

भेट शिवाशी

मुला बाळांचे हात गळ्यात,
 हवा कशाला हिऱ्याचा हार ?
तृप्ती चे हसू चेहऱ्यावर,
 कशाला करू साज शृंगार.....?
नकोसे वाटतात दागिने आता
 खरे समाधान असो द्यावे चित्ता.
एवढेच मागणे हरि तुजपाशी,
 भेट व्हावी जीवाची शिवाशी.....!
✍️ सुजाता 🙏

नाविका, रे

नाविका रे,
तुझ्याच हाती आहे 'नांव'  पैलथडी नेणं.....
खूप झालं अलिकडलं  थिजलेलं जिणं !
हसणं-रडणं-चुकणं, अन् चुकत चुकत शिकणं 
महोत्सव बनलं, अवघं आयुष्यभराचं लेणं...!
✍️ सुजाता

Tuesday, July 26, 2022

आठवणी

आठवणीं.....
भूतकाळातल्या आठवणींनी भारी छळलं,
तेव्हा मी त्यांना तिलांजली द्यायचं ठरवलं.
मन घट्ट करून आठवणींना सरणावर चढवलं,
अन् सरळ मी काडीनी, पेटवूनच दिलं ।
आठवणी जळताना मात्र नवलच घडलं....
एकेका आठवणी चं फुलपाखरू बनलं !
आता मी आनंदी विचारांची फुलवली फुलं,
आठवणींच्या फुलपाखरांनी, आयुष्याचं नंदनवन केलं,
आयुष्याचं नंदनवन केलं....!!
✍️ - सुजाता 🦋🦋

Sunday, July 24, 2022

तू


मंजुळ झरे गोड पक्षी 
तुझेच गीत गाती 
ही झाडे, हे वारे 
तुला आळविती.
सूर्य, चंद्र,तारे,  सारे
माझी भक्ती जागविती
द्वैत सारे संपून मी तुझ्यात
विरघळून जाऊ दे..... 
तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे .....
तुझ्या मुरलीची धून 
श्वासांमध्ये भरून जाऊ दे 
 तुझी कविता रचण्यासाठी शब्द लाभू दे, अवघे आयुष्यच माझे तुला वाहू दे.....!!
✍️ सुजाता 🙏

Friday, July 22, 2022

ती ..‌‌आणि ही

ती एक अळी होती, छोटीशी.... 
ओंगळवाणी,.....confused, 
नाराज स्वतःवरच....स्वतः च्या रूपावर....!
स्वतःवरचा राग इतका वाढत गेला,
की कोंडून घेतलं तिने, स्वतःला... कोशामध्ये... 
कुरूप असं सुरवंट बनून....!
कोशातल्या काळ्याकुट्ट अंधारात ती गुदमरून जाऊ लागली.......
 तिला वाटलं संपलं आता सारं.....
This is the End !
but that was not the End, 
that was a Bend......
ज्या क्षणी तिच्या हातात करण्यासारखं 
काही उरलं नाही, 
त्या क्षणी तो कोश फुटला आणि ती फुलपाखरू बनली.....
एक सुंदर,....रंगीत फुलपाखरू .....!
आता ती मुक्त होती......!
 विहरू लागली ती,  स्वच्छंदपणे......
                    आणि ही.....
 एक भग्न मूर्ती..... कुरूप, दगडी... काळी.
 नाराजच असायची तीही, स्वतःच्या रूपावर.
आजूबाजूच्या सुंदर सुंदर मूर्ती बघून 
आणखीनच खिन्न व्हायची....!
आणि एक दिवस तिच्यावर घाव पडू लागले....
असह्य वेदना देणारे,....
 छिन्नी चे घाव.....
 ती धावा करू लागली तिला निर्माण करणाऱ्याचा.....
 पूर्णपणे शरण गेली.....
 "सोडव मला यातून, किंवा पूर्णपणे  तोडून तरी टाक....."
पण शेवटचा असह्य करणारा घाव बसला, 
आणि तिच्या समोर आरसा आला.....
 आरशातले आपले रूप पाहून
 तिचा विश्वासच बसेना ....
" ही  मीच आहे.....?  इतकी सुंदर....?
 असामान्य..... अलौकिक.....!! ?"
आता ती एक देवी बनली होती,....
 देव्हाऱ्यात पूजली जाणारी.....!
✍️ सुजाता

आठवणी

तू माझ्या सह कधी राहिलाच नाहीस,
त्यामुळे सोडून जाण्याचा प्रश्नच नाही....
माझ्याकडे तुझी कोणतीही वस्तू नाही,
जी हरवण्याची भिती नाही ! 
माझ्या जवळ तुझा फोटोही नाही,
त्यामुळे फाटण्याचा प्रश्नच नाही.
मी ओठांवर तुझं कधी नाव येऊ दिलं नाही,
त्यामुळे कोणी ऐकण्याची भिती नाही !
माझं प्रेम मी तुलासुद्धा जाणवू दिलं नाही,
तुला आवडण्या न आवडण्याचाही प्रश्न नाही.....
माझ्याजवळ फक्त तुझ्या आठवणी आहेत,
ज्या पुसट होण्याची भिती नाही.....
अन् त्या क्षणांच्या साठवणी आहेत,
ज्या कधीही संपणार नाहीत.....!!
✍️ सुजाता 


Thursday, July 21, 2022

अंध:कार

तुटतेय, उन्मळून पडतेय मी,
म्हणून माझ्या हरिला आळवले मी
पण देव म्हणाला, बाळा, 
तुझ्यात  नाही काही  कमी....!
नकोशी नाती, गोष्टी गळून जाऊ देत
हव्याशा गोष्टीच जुळून येऊ देत
जे तुझ्यासाठी योग्य तेच घडून येऊ देत !
मोडत नाहीस तू,
'स्व'रूपात घडते आहेस....
तुटत नाहीस तू, 
अंधार तोडते आहेस 
अंध:कार भेदते आहेस !
उषःकाल होतो आहे,....
सत् चित् स्वरूपात
मीच तुला घडवतो आहे !
✍️ सुजाता 🙏🌹

my Life

Today, when I was sitting with my son Himanshu, I suddenly Realised that my God only has given him to me,..... may be to learn something.
 I got Aware that whoever people come in my life, my husband, my daughter, my brother and sister, my friends,....God has given to me.... 
He is sending all the Situations to me, for Making me a Better Person, making me to Let Go, to Elevate in life, to make to Understand the Importance of Forgiveness....and to make me a Pure Person again, just as He had sent me in this world !
       So, Everything in my Life, is His Gift to me !
I now, Wholeheartedly Accept Everything He gives me, Every Person I meet, Every Incidence that happens with me, is His Wish !
He has a Purpose behind it..... and when I Accept Happily, whatever He gives to me, He becomes Happy, too !
So, from this Moment, I Accept Everything that Happens with me, Smilingly.😃🙏🏻
I Drop every little Resistance !
I Drop Rejection !
I drop a "NO" !
I Let Him Give me whatever He Thinks is "सही" for me !
If He wants me to jump from a mountain, He will Ensure that I Fly....and not Fall......!! 
If in case, I'm dragged towards a difficulty, He will Pull me out of it.....
I have Full Faith in Him !
    Whatever He is Planning for me, is "सही" , even if I don't understand it Now.
Therefore, from this moment, I Accept Everyone and Everything in my Life, bcoz, it is Given by Him !!!!

😃🙏🏻🌹💞

चौकट

घाईघाईने घरातून निघताना 
तिनी विचारलं,
आरशातल्या आपल्याच प्रतिमेला'
"बरी आहेस, ना ?"
कसनुसं हसत प्रतीमा उत्तरली,
"ठीक आहे, पण तेवढी ती 
'चौकट' काढलीस, तर बरं,....
जीव घुसमटतोय, ग....."
धीटपणे ती चौकट काढली तिनं,
अन् ऊत्फुल्लपणे, तिची प्रतिमा आरशांत मावेनाशी झाली......
✍️ सुजाता 💃

Wednesday, July 20, 2022

जगणं

खूप  'धड़पड़ून' संभाळलंय्'  स्वतःला,
'सावरण्याचं ' महत्व जाणते मी ।
चालता चालता पड़ून,
 'ऊड़ायलाही'  शिकलेय् मी,
आभाळापेक्षा ही जास्त 
जमीनीला  'मानते' मी ।
न  'मोड़ता' वाकायला, 
आणि  'पुरलं' जाऊनही 
पुन्हा पुन्हा  नव्याने  
ऊगवायला  शिकतेय् मी
-✍सुजाता

Tuesday, July 19, 2022

शेला

मनात हजारो विचार, ‌.‌..‌
त्यांचा गुंता झाला ... 
कसा गुंफावा त्याचा, 
आता मी शेला.....?
ओबड-धोबड विणलेला, 
तुलाच अर्पण केला,
"अहं" मध्ये भरकटलेला,
जीव माया ममतेत गुंतलेला.....
तूच करून घे देवा मोकळा, 
माझा श्वास अडकलेला !
फुले वेचिता वेल, बहरूनी आला...
मोगरा फुलला ... मोगरा फुलला...!!
✍️ सुजाता

Monday, July 18, 2022

स्वातंत्र्य

नमस्कार,
 मी सुजाता मोघे.
 हे वर्ष आपल्या देशासाठी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली ! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग, सुखदेव इत्यादींपासून, ते अगदी लोकमान्य टिळक, सावरकर, गांधीजी यांसारख्या थोर क्रांतिकारकांनी किती मोठा लढा दिला, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच ! या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखतो आहोत !
पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी लिहिताना माझ्या मनात विचार आला, की स्वातंत्र्य हे फक्त देशापुरतेच मर्यादित असते का ? आपले सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्य, आपले कार्यक्षेत्र यामध्येही स्वातंत्र्याचा तेवढीच गरज असते. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे !
स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय ?
आई वडील मुलांना स्वातंत्र्य देतात किंवा पती पत्नीला स्वातंत्र्य देतो म्हणजे नेमकं काय ? 
ते कोण स्वातंत्र्य देणारे ....?
त्यांनी स्वतःचे स्वातंत्र्य काढून दिलं का ?
 स्वातंत्र्य असं कधी कुणाला देता येतं का....??
ते तर आपलं स्वतःचं च असतं.....!
प्रत्येकाला ते जन्मतःच मिळालेलं असतं....!
पण प्रत्येकाला स्वतंत्रपणे वागण्याचं धैर्य नसतं.
कारण मग पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडता येत नसतं.
स्वातंत्र्य म्हणजे 'स्वैराचार' नव्हे .....
आपल्याला हवं तसं वागणं नव्हे.....!
स्वातंत्र्याबरोबर आलं पाहिजे 'जबाबदारीचे भान',
स्वातंत्र्य म्हणजे 'आत्मसन्मानाची जाण' !
स्वातंत्र्याचे शिवधनुष्य पेलता आलं पाहिजे,
म्हणजे आयुष्य 'आत्म तेजाने' झळाळतं !!
स्वातंत्र्याच्या या संकल्पनेची जाणीव मला शाळेत असल्यापासूनच झाली. शाळेत असतानाच माझ्या आई-वडिलांनी कधीही माझ्यावर, तुला अमुकच नंबर मिळाला पाहिजे किंवा इतके मार्क मिळालेच पाहिजेत किंवा तू या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घे, अशी जबरदस्ती केली नाही ! त्यांनी फक्त मला अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. आयुष्यात जर काही मिळवायचे असेल, चांगली करिअर करायची असेल तर चांगला अभ्यास करणे आणि उत्तम मार्क मिळवणे कसे गरजेचे असते हे त्यांनी मला कायम स्वतःच्या उदाहरणांवरून पटवून दिले.
 पुढे कॉलेजमध्ये असताना सुद्धा, सहलीला जाताना किंवा पार्टी वगैरेंना जाताना, त्यातील संभाव्य धोके माझ्या आई-वडिलांनी मला अगोदरच दाखवून दिले. माझ्या आई-वडिलांनी कायम माझ्यावर विश्वास दाखविला.
 मला असे वाटते की स्वातंत्र्य आणि विश्वास हे हातात हात मिळवूनच जातात. पालकांनी मुलांना स्वातंत्र्य द्यावे, मुलांनीही स्वतंत्रपणे विचार करून आपली करिअर किंवा जीवनसाथी निवडावा. असे करताना थोड्याफार चुका झाल्या, तरी पालकांनी मुलांच्या पाठीशी राहावे. खरे तर या चुकांमधूनच खूप काही शिकायला मिळत असते. मीही कॉलेज संपल्यानंतर एक कोर्स निवडला होता, जो मला जमला नाही. पण माझ्या आई-वडिलांनी आणि भावंडांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास दाखवून तो कोर्स निवडण्याचे आणि नंतर तो न जमल्यामुळे सोडून देण्याचे ही पूर्ण स्वातंत्र्य दिले ! त्यावरून मला खूप काही शिकता आले !
 आपल्याला काय जमते हे आपल्याला स्वतःलाच तपासून पाहता येते, आणि तरीही न जमल्यास ते सोडून घेऊन, त्या अनुभवापासून पुढील आयुष्यासाठी खूप काही शिकता येते !
तसेच माझ्या लग्नानंतरही माझ्या पतीने मला हवे तसे जगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले ! माझ्या मुलांना वाढवण्यासाठी मी संपूर्ण वेळ "होम मेकर" - गृहिणीची भूमिका निभावली. पण मला पुस्तकांची आणि वाचनाची अतोनात आवड असल्यामुळे, "आपली स्वतःची लायब्ररी असावी" अशी माझी तीव्र इच्छा होती. ते करण्यासाठी सुद्धा माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण मुभा दिली.बरेचसे आर्थिक नुकसान सोसूनही माझ्या या इच्छेला आणि हौसेला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला ! " स्वतःचे वाचनालय चालवणे" हे आर्थिक दृष्ट्या कधीच "नफ्याचे नसते" हे मला सात वर्ष वाचनालय चालवल्यानंतर पूर्णपणे कळून चुकले ! परंतु तरीही त्यांनी मला कायम पाठिंबा दिला !
माझी साहित्याची आणि समाजसेवेची आवड आणि तळमळही मला पूर्ण वेळ घरात स्वस्थ बसू देत नव्हती. मी रोटरी, इनरव्हील, वनिता समाज, सखी मंडळ इत्यादी विविध मंडळांमध्ये काम करू लागले, ते सुद्धा माझ्या घरातल्या सर्व मंडळींच्या पाठिंबामुळे आणि सहकार्यामुळेच !
 माझ्या स्वतःच्याच उदाहरणावरून मला असे सांगायचे आहे, की प्रत्येक व्यक्तीला अत्यंत तळमळीने व आपले इतर कर्तव्य पार पाडून स्वतःसाठी वेगळी ओळख निर्माण करणयाचे स्वातंत्र्य असते ! , स्वतःचे आयुष्य स्वतःच्या आवडीप्रमाणे, इच्छेप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असतेच, परंतु त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले इतर माणसांप्रती असलेले कर्तव्य चोखपणे पार पाडावे पाडावे लागते ! 
स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे, - स्वैरपणे जगणे नव्हे !
 स्वातंत्र्य म्हणजे मनमानी किंवा स्वैराचार नव्हे ! 
स्वातंत्र्य म्हणजे आपण निवडलेला मार्ग चोखपणे आणि जबाबदारीने निभावणे !!
"पिंक" या सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेवटी जे भाषण किंवा स्वागत केले आहे, त्याचा स्वैर अनुवाद मी एका कवितेत केला आहे, तोच शेवटी मांडावासा वाटतो -

तू चाल पुढे ,
तुझे स्वातंत्र्य तुझ्या हाती,
मात्र तू जपावीस योग्य नाती‌‌....
तुझ्या नव्या वाटांचा,  
काळ शोध घेईल....
नवी पिढी आता
तुझ्या विचारांचा, बोध घेईल...!
पायीच्या शृंखलांना पैंजण मानू नकोस....
त्या वितळवून त्यांचे 'पंख' कर...
तुला पायी तुड़वणा-यांना, 
तू खुशाल 'ड़ंख' कर !
रूळलेली, काट्याकुट्यांची वाट सोड़, 
अवकाशात भरारी घे...
तुझ्याबरोबर, तुझ्या सारख्या सख्यांना ही ऊभारी दे !
मन तुझं साफ आहे, तर
रावणालाच काय, रामालाही 
तुझी परीक्षा घेण्याचा अधिकार नाही....
तुला त्रासच काय, शिक्षा देण्याचाही अधिकार नाही
तुझ्याच हाती आहे आता अंधारातील मशाल,
तूच आहेस रे मना, ऊद्याचा उषःकाल....
                        ऊद्याचा उषःकाल....!!

✍सुजाता मोघे, 





Tuesday, July 5, 2022

पाऊस

"आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा पाऊस "

बालपणी पाऊस येतो,
      होड्या घेऊन अंगणात.....
शाळेला सुट्टी, मैत्रिणींशी मस्ती,
वेळ जातो एकमेकांना भिजवण्यात !
तरुणपणी पाऊस येतो,
       हुरहुर घेऊन मनांत.....
स्वप्नातल्या राजकुमाराबरोबर
    भिजवतो एका छत्रीत !
लग्न झाल्यावर पाऊस आणतो
        आजारपणाची भिती,
मुलांसाठी Vicks, ह्यांच्यासाठी भजी,
        ह्यातच वेळ जातो किती !
प्रौढपणी पाऊस म्हणजे
     गाड्या बंद, आणि धास्ती.....
मुलं, सुना, नातवंड उशीरा येती, लाईट्सही जाती !
      पण .... लागता नेत्र पैलतीरी,
हाच पाऊस आणतो 'त्याची' कृपादृष्टी .....
       त्याच्या कृपेच्या वर्षावात न्हाऊन घ्यावं,
आता कशाला कुणाची भिती ?!!
 -- सुजाता

Sunday, July 3, 2022

Rain

Rain is not just Drops of Water,
it's a Melodious Music to the Ear
A Bundle of Joy which is so Pure
A Chance to Dissolve in the Nature....
✍️ Sujata 

बारिश की बूंदें


🌧️⛈️🌨️
कितने बादल लाॅंघकर....
 कितने पर्वतों को पार करके 
कितनी दूर से आया हूं मैं 
बारिश की बूंदे बनकर.....।
मिलो तो मुझसे, छतरियाॅं हटाकर
भीगो तन मन से, .....
समां जाओ मुझमें.....
खुद से मिलोगे तुम, बारिश में भीग कर !
✍️ सुजाता 🌨️⛈️🌧️

गती

आत्ता आत्ता तर 
सायकल शिकत होतीस तू,
मी मागे धावत होते.....
एवढ्यात कशी तुला, 
तुझी गती मिळाली ग....?
आत्ता आत्ता तर माझा हात धरून
 एबीसीडी गिरवत होतीस तू,
 मी शिकवताना ओरडत होते..... 
एवढ्यात कशी तू मोठमोठी 
परीक्षा दिलीस गं ?
मी "मंमं" आणेपर्यंत रडणारी तू,
आता तू जेवायला येईपर्यंत 
मी वाट बघत बसते,......
आता गाडी चालवतेस तू,
आणि मी  मागे बसते....!
 तुझ्या डिग्रीच्या फोटोंमध्ये 
मीच आनंदून हसते .....!
आयुष्य धावतंय,.... पुढे पुढे पळतंय..
दिवस.... महिने.... वर्ष.... 
कसं भुर्कन सरतंय.....
एक पर्व संपून नवीन पर्व सुरू होतंय, 
आयुष्य असंच असतं, ना, आई....
आता मला पटतंय.....!!
✍️ सुजाता 💕

Friday, July 1, 2022

बेचारा

सूरज देता है रोशनी, और फूल, सुगंध ...
आग देगी जलन, कोई प्यार, तो कोई देगा गाली ।
जो है जिसके पास, वो ही देगा,
इसमें है कौनसी बात निराली ।
मैं लुटाऊं प्यार  - खूशी,
और वो फैला रहा नफरत और निराशा....
बेचारा, वो तो खुद है, 
चाहत- लगाव और आशा का प्यासा !
✍सुजाता