Thursday, December 31, 2020

तू च सर्वत्र

देवा, तुझे कृपाछत्र राहो, 
तू आणि तूच राहो, इथे तिथे, सर्वत्र....
बाकी न माझी इच्छा उरो, न मी.
मन माझे न भटको अन्यत्र....!!
✍️ हरिसखी

Wednesday, December 30, 2020

"निळा"

विंदांची "ऊंट" ही कविता वाचली,
 आणि हे लिहिलं.....

हा यात्रेकरु इथे न रमला....
निळ्या सावळ्या शोधीत जाई.... !
तहानेने व्याकुळ होई,
भूकही लागे भेटण्याआधी....
निळा सावळा दिसला का पण ?
खूण तयाची एकच साधी,
निळासावळा दिसतो ज्याला,
तोच निळ्याचा होऊन जाई.....!
✍️ हरिसखी

Friday, December 18, 2020

ठिणगी

हे बरे झाले, देवा, दिला अंधार तू इतका मला....
एक ठिणगी आंत माझ्या, लागली उजळायला !
या प्रवासाची दिशा, आता नको बदलायला,
जन्म जावा लागतो ही सार्थता समजायला.
नाकारले जाण्यातला दर्द ज्याने जाणला,
रिते होण्यातला आनंदही त्यानेच हो, ओळखला !
प्रेमातही अन् द्वेशातही, माझा जीव होता अडकला,
मीच केले मोकळे, त्यांना ही, आणि स्वतः ला !
✍ सुजाता

Thursday, December 10, 2020

गिनती छोडी

जबसे मैंने "गिनती" छोडी,
मैं खुश होती गई....
दिलके "घांव" गिनना छोडा तो,
वो जख्म भरते गए....
किसकी "बोली" गिनना छोड दिया, तो
मैं शांत शांत होती गई....
किसीको कितना दिया, नहीं गिना,
तो "अहंभाव" छूट गया ।
"हरिजप" गिनना छोड दिया,
तो भगवन् "बेहिसाब" देते गए... ।
✍️ सुजाता

Monday, December 7, 2020

साद

आता होत नाहीत आपल्या दोघांत  वाद,
कारण उरलाच नाही आपल्यात  ' संवाद '
तू कधीच देत नाहीस मला  दाद....
आणि मीही घालत नाही आताशा तुला  'साद' !

--✍सुजाता.

Friday, December 4, 2020

मोकळा श्वास

रंगूनी रंगांत साऱ्या, रंग माझा वेगळा....
गुंतूनी गुंत्यात साऱ्या, 
पाय माझा मोकळा
काडी काडी जमवूनी मी,
जीव ओतिला सगळा,
त्या घराच्या चौकटितूनी
आता मजला वगळा....!
बीज लाविले, "स्वत्त्वाचे"
त्याला कोंब आला कोवळा,
मुक्त जगाच्या अंगणी मज
श्वास घेऊदे, मोकळा....!!
-✍️ सुजाता

Saturday, November 28, 2020

चिऊताई

चिऊताई चिऊताई दार उघड.....
करियर च्या संधी दार ठोठावतायत,....
नव-याचा ङब्बा, मुलांचा नाश्ता 
किती काळ करणार ....?
अग चिऊताई, दार ऊघङ.....
एकटीनेच पाहूणचार, कुळधर्म सांभाळणार ?
दाबून टाकलेले छंद साद घालताहेत....
चिऊताई चिऊताई आता तरी दार उघड !
दारावरची टकटक बंद होईल,...
घरातलेही आपापल्या जगात व्यस्त होतील....
एकटीच मग तू कुढत बसशील....
चिऊताई वेळीच दार उघड.....
कोंङलेला श्वास मोकळा कर,
ऊंच आकाशात भरारी घे,
चिऊताई चिऊताई दार उघड, 
आणि आता स्वतःसाठी जग !!
--✍ सुजाता

Wednesday, November 25, 2020

सख्या हरि

रे सावळ्या, सख्या हरि,
हळूहळू जाणवतंय मला....
तू अन् मी भिन्न नाहीच मुळी.
भक्तिमार्गावरून चालतांना,
सगळं सगळं समर्पित करत गेले तुला,
पण तेव्हाही, हे द्वैत जाणवत होतं मला.
माझं प्रत्येक कर्म, तुला अर्पितांना,
कर्तेपण स्वतःकडे घेतलंच, अजाणतां...
जर मी कर्ता च नाही, 
तर तुला काय अर्पण करणार ?
सारं तुझंच तर आहे, 
मी तुला काय देणार ??
आता शांत बसल्यावर, 
जाणवायला लागलंय् मला ....
तू तर माझ्यातच आहेस सामावलेला !
माझ्यातच गवसला मला, 
माझा सखा हरि सावळा,.....
अवघे जीवन बनले आता, 
आनंदमयी सोहळा....!!
✍️ सुजाता 🙏

Wednesday, November 18, 2020

विहीर

कुठचीही विहीर मला एखाद्या बाईसारखी वाटते.....
कित्ती गुपितं, ती आपल्या मनांत लपवते.
पाण्याने काठोकाठ भरलेली असेल, तर
एखाद्या गर्भार स्त्री सारखी, श्रांत, तृप्त...
आंत भरपूर मासे, पाण गवत,
आणि काठांवर पोहायला शिकणारी मुलं.
कधी एखादी विहीर, एखाद्या
अल्लड, परकरी मुलीप्रमाणे भासते....
जेव्हा तिला एखादी वेल, वेढून टाकते.
कधी मात्र ती, कमरेत वाकलेल्या
जख्खं म्हातारी सारखी दिसते....
जेव्हा ती सुकते,....आटते....!
सगळा भूतकाळ जणू आंत आंत कोंडते,..... गाडते..... 
बघणाऱ्याला उदास करते....
पण प्रत्येक विहीर, मला एखाद्या 
बाईसारखी वाटते.....
✍️ सुजाता.

मुहोब्बत

मेरी हर खुशी में हो तेरी खुशी,
मुहोबत में ऐसा जरूरी नहीं.....
तू ना मिलना चाहे, तो यही सही,
ना मिलना तेरा कोई 'दूरी' नहीं....
मुहोबत है ये, "जी हुजूरी" नहीं ।

Monday, November 16, 2020

माझी कविता

माझी कविता.....
माझी कविता माझ्यासाठी खास आहे....
ती फक्त क्षणभराचा निःश्वास नाही,
माझा आयुष्यभराचा श्वास आहे,
ती सतत माझ्या आसपास आहे.
माझ्या अलवार स्वप्नांची चाहूल आहे,
संसारातल्या तापांवरची भूल आहे....
सख्या सावळ्याच्या कृपेची झूल आहे.
जणू सूर्याचं कोवळं ऊन आहे....
किंवा कान्ह्याच्या बांसरीची धून आहे.
माझी कविता खरंच माझ्यासाठी खास आहे !
✍️ सुजाता.

Monday, November 9, 2020

भक्तिमार्ग

कर्मयोग भासे कठीण.....
कसे करावे प्रत्येक कर्म,  ईश्वरार्पण...?
प्रत्येक कर्म करताना चिंता काळजी न वाटणे ही एक खूण.
जळी स्थळी सर्व काळी परमेश्वर करतो रक्षण,
कर्मफलदाता ईश्वरच आहे हे पक्के जाण.
भरवसा ठेवता देवावर, येते निर्धास्तपण.
भूतकाळाची आठवण,भविषयाचे चिंतन हेंच दुःखाचे खरे कारण ॥
करता नामाचे अखंड स्मरण,
भक्तिमार्ग आचरावा आपण !
भक्तिमार्गाचे करता अनुसरण,
होईल शुद्ध,  अंतःकरण...
आणि स्व- स्वरूपाची येईल जाण !!

✍️ सुजाता
 

Friday, November 6, 2020

"आनंदाचे चांदणे"

आनंदाचे चांदणे
गर्द अंधाऱ्या रात्रीनंतर पसरते, 
सौम्य शीतल चांदणे....
तप्त भोगल्या दुःखानंतर लाभते, आनंदाचे चांदणे....
निरागस माझ्या बाळाचे हसणे
माझ्या काळजीपोटी लेकीचे लटके रुसणे,
हरी तुझ्या कृपेने लाभले मला 
हे कैवल्याचे लेणे....
पसरवीन मी, माझ्या परीने 
हे नक्षत्रांचे देणे....
✍️ -- सुजाता 

Thursday, November 5, 2020

सूर

ईश्वर कृपेचा पूर उसळला,
दु:खाचा तिमीर दूर झाला....
माझा सारा नूर बदलला,
मज अंतर्यामी सूर गवसला....!
✍️ सुजाता

Boost ur Life

मोबाईल प्रमाणेच, आपल्या मनावरही
मधूनमधून Antivirus फिरवावा,
आपलं Mind Cool करावं ....
नको असलेल्या, निराशाजनक
 Junk Files Clear कराव्यात,
द्वेशाचे, मत्सराचे Caches Clean करावेत.
म्हणजे मग बघा, आयुष्य कसं Boost होईल...
✍️ सुजाता 😃

Monday, November 2, 2020

प्रवास

आयुष्यातल्या प्रवासाची बॅग हलकी करायला आता मी शिकते आहे,....
मत्सर, द्वेष, अपेक्षांचं ओझं
हळूहळू उतरवते आहे.
भोवतालची माणसं आणि परिस्थिती
यांच्यावर कंट्रोल न करणे जमते आहे....
जे मी बदलू शकत नाही,
ते तसंच सोडून देते आहे.
जे घडून गेलं, त्यावर न खंतावता,
नव्याचं स्वागत करते आहे !
हाती जे जे सूर येतायत,
त्यावरच गाते -नाचते आहे...
आणि इतरांच्या रागा - लोभाची फिकीर न करता, स्वतःवरच प्रेम करते आहे...!
आयुष्यातल्या प्रवासाची बॅग हलकी करायला आता मी शिकते आहे,....!!
✍ सुजाता.

Travel Light

It is said,..." Travel Light ".....
But we should also "Live" Light....!
We Born Empty handed,
We Die Empty handed.
Then why carry Extra Baggage,
of Expectations, Desires & Hatred....!
Why Worry about the Destination....?
When we dont know the Expiration !
We should just Play our Role....
Why unnecessarily burden the Soul ?
The Last Stop will be 
as Beautiful as the Journey Itself....
As, we shall meet the Guide Himself !
-- ✍ sujata.

Friday, October 30, 2020

माहेर

प्रत्येकीला एक माहेर असावे,
कर्तव्याच्या, जबाबदारी च्या जंजाळात
एक विसाव्याचे स्थान असावे,
प्रत्येकीला एक माहेर असावे.
सतत adjustment करतांना, 
स्वतः  back- stageला  राहतांना,
स्वतः चा Preference जपणारी 
एक   Space  असावी,
प्रत्येकीला एक माहेर असावे.
अष्टौप्रहर झटताना, 
दुसऱ्याचा विचार आधी करतांना,
आपलंही मन जपणारं कोणी असावे,
सारखं कामात व्यस्त असताना,
विरंगुळ्याचे चार क्षण मिळावेत,
यासाठी तरी, प्रत्येकीला माहेर असावे.
आणि ज्यांना असे माहेर नाही, 
त्यांच्यासाठी आपणच माहेर व्हावे....
पण प्रत्येकीला माहेर असावेच !
✍️ सुजाता 😌

Thursday, October 29, 2020

कोजागिरी

को जागर्ती ....? अर्थात "कोजागिरी" !
"जागण्याचा" महोत्सव.....
जागे होण्याचा, भानावर येण्याचा उत्सव
मी खरी कोण आहे....?
 माझे खरे " स्वरूप" काय...?
माझ्या जगण्याचे प्रयोजन काय....??
coexistence.... correlation....!
सहसंवेदना...... सह अनुभूती....
सौंदर्य आणि शांती, आनंद आणि तृप्ती,
यांच्या समन्वयाची अनुभूती....!
सृजनशीलतेची सजगता जी जागी करी,  ती खरी कोजागिरी.....!!
चंद्रशलाका अमृताचा वर्षाव करी !!
✍️ सुजाता 🌕

मी

हे बरे झाले, देवा, दिला अंधार तू इतका मला....
वाट माझी शोधावया, झालो मी स्वतः दिवा...!
काटेरी वाटेवरूनी मी, चाललो एकटा असा....
स्वतःच बनलो ऊर्जा, अन् झालो मी माझा सखा !
✍ सुजाता

Good, i was lost in the middle of Darkness, alone....
I could BE my own Light !
I got the strength to Fight !
Singing my own Song in the Starry night....
Keeping all the worries, out of sight.
Confident to win the War like a Knight.
Flowing with the wind, enjoying my Flight....!!
✍ sujata

Wednesday, October 21, 2020

मोक्ष

कृष्णाचेच  दुसरे नाव "सच्चिदानंद"....!
 सुख आणि दुःख दोन्ही निरर्थक....
 जे मी स्वीकारते ते सुख,
 आणि जे मी नाकारते ते दुःख....!
सुख आणि दुःख हे आनंदाचे विभाजक.
आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही ....
जसे "सुख" च्या विरुद्ध "दुःख" ....
"प्रेम" च्या विरुद्ध  "द्वेष",
"स्वर्ग"  विरुद्ध  "नरक" .....
पण "आनंद" च्या विरुद्ध काहीच नाही !
कारण 
आनंदाच्या विरुद्ध काही नाहीच...!
"सच्चिदानंद" म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही समावेशक....
आणि "मोक्ष" म्हणजे तरी दुसरे काय "स्वातंत्र्य" ..... किंवा "मुक्तता"....!
मोक्ष म्हणजे सुख आणि दुःख 
दोन्हीचा समभाव....
"मोक्ष" म्हणजे कसलाच नाही  "अभाव"

Tuesday, October 20, 2020

चूल, मूल,अन् संसार पाश,
यांत गेले किती तरी दिवस,.....
तारुण्यात ऑफ़िस - करियरचा ध्यास
वेळ नसे घ्याया, मोकळा श्वास .
नाटक,सिनेमा,मौज अन् प्रवास....
तरीही वाटे काही उदास ....।
समाजऋण फेडायाची आता लागे आंस....
सोड़ण्याआधी शेवटचा नि:श्वास !
 -- ✍️सुजाता

Monday, October 19, 2020

सद्चिदानंद

कृष्णाचेच  दुसरे नाव "सच्चिदानंद"....!
 सुख आणि दुःख दोन्ही निरर्थक....
 जे मी स्वीकारते ते सुख,
 आणि जे मी नाकारते ते दुःख....!
सुख आणि दुःख हे आनंदाचे विभाजक.
आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही ....
जसे "सुख" च्या विरुद्ध "दुःख" ....
"प्रेम" च्या विरुद्ध  "द्वेष",
"स्वर्ग"  विरुद्ध  "नरक" .....
पण "आनंद" च्या विरुद्ध काहीच नाही !
कारण 
आनंदाच्या विरुद्ध काही नाहीच...!
"सच्चिदानंद" म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही समावेशक....
आणि "मोक्ष" म्हणजे तरी दुसरे काय "स्वातंत्र्य" ..... किंवा "मुक्तता"....!
मोक्ष म्हणजे सुख आणि दुःख 
दोन्हीचा समभाव....
"मोक्ष" म्हणजे कसलाच नाही  "अभाव"

Tuesday, October 13, 2020

तू

माझ्या मनात तुझे येणे जाणे
कधी सुरू झाले नकळे .....
अगदी लहानपणी, शाळेच्या पहिल्या दिवशी 
आई हात सोडून गेली तेव्हा -
       तूच माझ्या मनांत आला होतास
आणि माझे डोळे पुसून माझ्याबरोबर
बडबडगीतं गाईली होतीस !
त्यानंतर आयुष्याचं अवघड वळण चढतांना,
         तूच माझ्या मनांत आलास,
आणि मला आश्वासक स्पर्श देऊन गेलास !
त्यानंतर माझ्या मनात आलास तू
गौरीहर पूजताना .....
आणि अनोळखी नव-याची 
जन्मोजन्मीची ओळख करून दिलीस !
त्यानंतर माझ्या मनात तुझे येणेजाणे
सतत चालूच आहे ......
लेकाच्या आजारपणांत रात्री जागताना,
         लेकीच्या यशात आनंदून हंसताना,
संसाराच्या सारीपाटात चढउतार सोसताना..
चहाच्या पेल्यातील वादळात सापडताना ....
माझ्या मनात तुझे येणे जाणे 
सतत चालूच आहे .
आता एकच मागणे आहे,
आता आयुष्याच्या उतरणीवर
माझ्या मनात तू येशील तेव्हा,
             "जाणे" रद्द कर.
अगदी माझेच या जगातून "जाणे" होईपर्यंत !
माझेच या जगातून जाणे होईपर्यंत !!
 ---- ✍️ सुजाता.

Sunday, October 11, 2020

पिकलं पान

अरे पिकल्या पाना,....
गळून पडणार म्हणून
का उगां खंतावतोस मनां ?
कधीकाळी नाजूक कोंब बनून,
तू वटवृक्षाची सुरूवात केलीस,
हिरवं गार पान बनून वाटसरूला
तुझयापरीने सावली दिलीस.
बहरानंतर पानगळ येणार,
हा ऋतुचक्राचा नियम असतो,
परिपक्वपणे गळून जायला,
मग तू का एवढा विरोध करतो ?
कदाचित गाणाऱ्या वाऱ्यासंगे
तू तरंगत जाशील....
कदाचित पाण्यावर पडून एखाद्या
मुंगीचा जीव वाचवशील....
रंगीत फुलांबरोबर कदाचित
गुच्छामध्ये गुंफला जाशील.
किंवा 'पत्री' बनून देवाच्या
चरणांवर वाहिला जाशील....
एखादा रसिक, वहीत ठेवून
तुला जाळीदार बनवेल,.....
कशावरून, गळून पडल्यावर
आयुष्य तुझं उजाड बनेल ?
झाडाचा Comfort Zone सोडण्यातच
आहे तुझं भलं, खरं !
आणि हे तुला, लवकरात लवकर
उमगलं, तर बरं !!
✍️ सुजाता 🍂

Wednesday, September 30, 2020

सर्वनाश

थोड़ं सावकाशीनं घे मित्रा,
एवढी 'धावाधाव' कशासाठी....?
आठ-सत्तावन... नऊ-तीन....
पळतोय जीव ट्रेन पाठी.....
काय होईल ५ मिनिटं उशीर झाला तर ?
सिग्नलसाठी थोड़ासा धीर धरलास तर...?
"मलाच हवं", "मीच पुढे" हा सोड़ अट्टाहास,
थोड़ं रेंगाळण्यातही आहे मजा खास....
Life मध्ये नुसतंच "Destination" नको,
"Journey" पण enjoy कर,
आयुष्याची मजा चाखावी, असा विचार कर.
स्वार्थीपणा आणि बेपर्वाई यात होतेय वाढ,
अरे, इतरांसाठी थोड़ासा तरी वेळ काढ....
माणसा- माणसांत जोड़ावेत पाश,
नाहीतर पुढे आहे "सर्वनाश" .....!!
✍सुजाता

पन्नाशी

सरली पन्नाशी, जवळ आली साठी,....
आता तरी सैल करुया, अपेक्षांच्या गाठी.
सोडून देऊ काही गोष्टी एकमेकांसाठी,....
भरभरून जगावे,आजारपण लागले जरी पाठी !
✍ सुजाता.

Sunday, September 27, 2020

नकार

एखाद्याने नकार दिला, म्हणून 
अपेक्षाभंगाचं दुःख कशाला
'माझ्यातच काहीतरी कमी आहे' 
असं नको मानायला
नाकारणा-याची  बाजू सुद्धा 
हवी समजावून घ्यायला 
मिळालेल्या 'होकाराचं' ही महत्व 
नक्कीच हवं जाणवायला !!
✍ सुजाता

Friday, September 25, 2020

आभाळ

आभाळ का एवढं दाटलंय्....
काय त्याच्या मनात साठलंय्
ढग नाही,बहुदा काळीज फाटलंय् ।
वसुंधरेवरचं प्रेम नाही ना आटलंय ?
✍️ सुजाता.

Wednesday, September 23, 2020

लौटना

हमारी चाहतों की कोई सीमा नहीं ।
लौटना ना जाने, वो जीना भी नहीं ।
हमारी जरूरतें तो सीमित हैं,
पर चाहतें अनंत ।
चाहतों का मोह हमें लौटने नहीं देता,
जो हमारे पास है, 
उसे भी समेटने नहीं देता ।
✍️ सुजाता

"एकटेपणा आणि एकांत"

एकटेपणा ....आणि   एकांत 
एकटेपणा  या जगातील सगळ्यात मोठी  शिक्षा आहे....
आणि  एकांत,   सगळ्यात मोठे  वरदान !
      या दोन  सारख्या दिसणाऱ्या  शब्दांमध्ये  आकाश- पाताळाएवढा  फरक आहे.
एकटेपणा  माणसाला घाबरवतो,.... 
तर  एकांत,  श्रांत  करतो !
एकटेपणा अस्वस्थता निर्माण करतो,  
तर  एकांत मनःशांती  !
जेव्हा आपण  बाहेरच्या  जगात बघतो,  तेव्हा  एकटेपणा  जाणवतो,....
पण  तीच  नजर स्वतः मध्ये वळवतो,  तेव्हा  एकांत अनुभवतो !
हे  जीवन म्हणजे सुद्धा  दुसरे तिसरे काही नसून, "एकटेपणातून  एकांताकड़े "  केलेला प्रवास  आहे ! 
त्या प्रवासातले  प्रवासी पण आपण आहोत,   आणि   अंतीम  ध्येय पण आपणच आहोत  !!
 ✍ ओशो

Friday, September 18, 2020

नाती

नाती बदलत जाती ...
जी सतत बदलतात ना , 
ती नाती ....
ऋतु बदलतात , 
Callander वरची पानेही बदलतात ,
मग नाती बदलली तर एवढी खळखळ कशाला ?
ऋणानुबंधाच्या गांठी ,
कधी नव्याने जुळतात , कधी बांधलेल्या सुटतात ,
तर कधी जुन्याच नात्यांचे पीळ बदलतात.
नातीच ना ती , बदलणारच !
रस्तासुद्धा सरळसोट असला तर एकसूरी होऊन जातो ,
थोडी वळणं , थोडे चढउतार वाटचाल सुसह्य करतात 
नदीसारखी नातीही वळणं घेत , चढ़त उतरत ,
पुढेपुढे सरकावी लागतात.,
नाहीतर ती कांचतात , कुजतात.
धागे उभे आडवे , काही घट्ट काही पीळदार ,
काही सैलसर , space देणारे ,
आयुष्याचं वस्त्र जरतारी करतात !
- -  ✍️ सुजाता

Thursday, September 17, 2020

माझी कविता

देवानी वरदान दिलंय मला,
 मनातल्या भावना कागदावर उतरवण्याचं
नाही तर माझ्याच भावनांच्या स्तुनामीमध्ये 
वाहून गेले असते,.... मीच.....!
आता कागदांना भिजवून, डोळे कोरडे होतात,
अंगार उतरवून वहीवर, मन होतं शांत आणि कडू जहर दुःख पिऊन,
 कवितेत उमटतं "स्मित"!
जे मोठ्याने ओरडू नाही शकत मी,
ते कागदावर ओतत जाते,....
स्वतःला रिती करत 
"सद्चिदानंदा"नी भरत जाते....!!
✍️ सुजाता

Wednesday, September 16, 2020

Tuesday, September 15, 2020

गुरू

गुरूमुळे येते जाग, 
भासमय  निद्रेतून.....
गुरूमुळे येते जाण, 
मी न कर्ता असल्याची.
गुरूमुळे येते भान, 
भक्ति मार्गावर चालण्याचे,
गुरूमुळे होते ज्ञान,
स्व स्वरूपाचे, 
सद्चिदानंद स्वरूपाचे !
✍️ सुजाता.

Monday, September 14, 2020

अलवार....

अशी ये तू,.... अलवार..
जशी येते वाऱ्याची लहर
किंवा फुलांचा सुगंध, हळूवार
तशी ये तू,.... अलगद..‌
न सांगता ये  तू, अचानक
बेलही वाजवू नकोस,
सरळ येऊन भेट,..... थेट...
माझी वेळ ठरवून येऊ नकोस,
हां, पण तुझा वेळ घेऊन ये, भरपूर
दोघं मिळून बसू, आठवणींच्या हिंदोळ्यावर
बोलू, कागदावर अलगदपणे उमटणाऱ्या कवितेसारखं,
आणि उमटवू, पुन्हा आठवणींचे क्षण, काळाच्या डायरीवर.
जाताना, थोडंसं मला घेऊन जा,
आणि थोडंसं स्वतःला ठेवून जा....
परत येण्यासाठी,
हिंदोळ्यावर झुलण्यासाठी....!
✍️ सुजाता
(एक प्रयत्न,.... गुलजार ची कॉपी शक्य नाही)

Tuesday, September 8, 2020

जखम

भाळीची जखम भळाळती राहण्याचा
अश्वत्थाम्याला शाप असतो,.....
पण आपण का उगीचच
जुनी दु:खं सांभाळून ठेवतो ?
२० वर्षांपूर्वी झालेले अपमान, शल्य
कुरवाळत बसतो....?
का, भूतकाळाला, वर्तमानातली जागा अडवू देतो....?
वर्तमान काळाला जो खरंच "Present" मानतो,
टोचणाऱ्या आठवणी जो मनातून काढून टाकतो,
तोच खरंतर मुक्त, आनंदी जीवन जगतो !!
✍️ सुजाता.

Monday, September 7, 2020

Saturday, September 5, 2020

सखे

सखे, थोडी उसंत घे,
स्वत:ला Super Woman मानू नकोस ग,
उरापोटी धावू नकोस ग...
तू अभ्यास नै घेतलास,
म्हणून मुलं नापास होणार नैत....
एक दिवस स्वैपाकाला सुट्टी दिलीस,
तरी उपाशी मुळीच झोपणार नैत !
तू लक्ष दिलं नैस,तर कोणाचंच 
काही अडणार नाही...!
पण तू दुर्लक्ष केलंस, 
तर मात्र मुकशील,
या मुक्त वाऱ्याला, धुंद चांदण्याला,
पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाला....
आणि हो, स्वत:च्या अस्तित्वाला ही !!  
✍️ सुजाता

आभासी जग

आम्ही राहतोय "आभासी" जगात,....
आम्हांला भानावर आणू नका.
सभोवार उभी केलीये "Virtual Reality" ची भिंत,
Likes आणि Comments शिवाय काही बोलूच नका !
Facebookवरच भेटूया,
Face to Face भेटूच नका.
WhatsAppवरच "Chat" करू,
"काय, कसं काय" विचारूच नका...!!
✍️ सुजाता.

Wednesday, September 2, 2020

कृष्णा.....

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये....
आम्ही सारेच 'अर्जून' झालोत, तू "आत्मविश्वास" जागवायला ये,
माझ्यासारख्या प्रेमवेङ्या राधेचा "सखा" बनायला ये....
हिंदू धर्मालाच नव्हे, मानवतेलाच ग्लानी आलीए, तू उद्धारायला ये....!!
✍ सुजाता.

मीच माझा सखा

पाऊस

नवी आशा

Tuesday, September 1, 2020

तू सुखकर्ता

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता.
मग मीही तुझाच अंश असता,
होईन मीही "आनंदाचा निर्माता"....
तुझ्याकडून सारे काही घेता घेता,
घेतो मी आता, तुझ्या "देणाऱ्या हाता" !
अन्न, कपडे, पुस्तकं, सारे काही आता,
 गरजवंतांना मी देईन स्वतः !
नाही विचार करणार मी स्वतः पुरता,
मगच सण साजरा होईल, 
आयुष्यभराकरता.....!!!
✍️ सुजाता


गूज

समुद्राला जशी असते "गाज",
पावसालाही असतो आपला असा "आवाज"
त्या लयीत विरून जाते लोकांची "कुजबूज"
पार उतरून जातो, आपला उरलासुरला "माज"
आणि मनांतच सुरू होतं, आपल्या मनीचं "गूज" !!
✍️ सुजाता

आशा


स्वप्नांचा पाठपुरावा करण्यातही आहे एक नशा,
प्रत्येकालाच मिळत जाते, आपापली दिशा,
Positive Thinkingच पल्लवित ठेवते आशा,
आणि घोर निराशेच्या तमातूनच उगवते नवी ऊषा !
✍️ सुजाता

तू

मूळारंभ तू, निर्गुण, निराकार तू....
भक्तांसाठी होशी, साकार तू !
तूच कर्ता,.... आणि करविता,
भक्तांचा तारणहार तू....!
संकट विमोचन, विघ्नहर तू...!
सद्- चित् - आनंदाचे मूर्तिमंत रूप तू !!
✍️ सुजाता.

मुक्त

खूप भांडले, झगडले,....
"मुक्त"  होण्यासाठी....
आता उमगतंय्  मला ....
मी "बद्ध "  नव्हतेच कधी !
✍️ सुजाता

मुक्त

खूप भांडले, झगडले,....
"मुक्त"  होण्यासाठी....
आता उमगतंय्  मला ....
मी "बद्ध "  नव्हतेच कधी !
✍️ सुजाता

Monday, August 31, 2020

विसर्जन

कळलंय् आता मला, "विसर्जनाचं" कारण.....
का राहतो बाप्पा, थोडेच दिवस, अन् का करावं त्याचं विसर्जन....
एखाद्याच्या येण्याची उत्सुकता, वास्तव्याची मौज,
जातानाची हुरहुर,आणि पुन्हा येण्याबद्दलची आण
हे सारं, शिकवून जातं आपल्याला आयुष्याचं तत्वज्ञान !
सुख असलं 'अल्पायुषी' तरी, करावं साजरं, छान..
आणि पुढे पुढे उलटतच रहावं, आयुष्याचं पान....!
✍ सुजाता

विसर्जन

गणेशाचं कसलं आगमन, 
आणि कसलं विसर्जन....
तो तर स्वयंभू....अनादी...
अनंत... सचेतन !
आवाहन करुया सद्भावनेचं, 
अन् षङ्रिपूंचं विसर्जन,
मग आयुष्य बनेल महोत्सव,
अन् भंवताल बनेल नंदनवन !!
✍ सुजाता.

Sunday, August 30, 2020

miracle


it was there, in front of her...
a Blank Paper -a White Canvas
she had Brush,
and Colours, of her Feelings,
a Pen, too, of her Thoughts 
but she didn't have Power,
or Confidence
to Express anything.....!
but then, suddenly, a Miracle happened,
through Bhagawad Geeta or Osho's 'Sayings'
through Meditation....
or Selp- help Techniques....
she got her Confidence.
she got Wings....!
and then....
she started Writing....
Non - stop, Non- tiring.... 
colours got downloaded on Canvas....
and 
she Crafted a Stucture....
very Beautiful.... Divine....
Miraculous....Marvoulous....!
Exactly like....
God had Crafted her....

✍️ sujata.

ती.....

तिच्या समोर होता,
पांढराशुभ्र कागद.... कोरा Canvas....
ब्रश होता तिच्याजवळ, 
आणि रंगही, - - - तिच्या भावनांचे,
पेनही होतं, 
आणि शब्दही, - तिच्याच विचारांचे.
पण नव्हतं बळ, किंवा आत्मविश्वास,
त्या कागदावर काही उमटवणयाचा !
पण मग, अचानक एक जादू झाली,....
ओशोंच्या वचनांची,..... Meditationची,.... किंवा 
Selp- help Techniquesची.....
तिला गवसला तिचा Confidence....
आणि मग झरझरू लागली 
तिची लेखणी,... अथक.... अविश्रांत...
रंग उतरू लागले, canvasवर झपाझप
आणि साकारलं गेलं एक शिल्प....!
सुंदर...... अद्भूत....!
अगदी तस्संच.....
तसं साकारलं होतं देवानी,....
तिच्या रूपात....!!!
✍️ सुजाता.

Saturday, August 29, 2020

आहिस्ता चल ऐ जिंदगी

आहिस्ता चल, ऐ जिंदगी,
अभी मुस्कुराना बाक़ी हैं ....
कईं गीत सुनना बाकी हैं,
कईं ख्बाब बुनना बाक़ी हैं ।
मंजिल तो मिलेगी जरूर....
सफ़र एन्जॉय करना भी जरूरी है ।
पतझड़ हो, या बहार....
हर हालमें खूष रहना जरूरी है ।
✍️ सुजाता

श्रावण

आत्ता होतं, लख्खं ऊन, 
अवचित् आली पावसाची सर....
कधी सुख कधी दुःख,
जशी फिरे निसर्गाची लहर....
ऊन-पाऊस, सुखदुःखाचा
 पाठशिवणीचा खेळ,
सारे सारे क्षणभंगूर, 
कसा लावावा 'मेळ'....!!
✍ सुजाता.

Connect

connect होता आलं पाहिजे,.....
निसर्गाशी,..... फुलांच्या हळूवार स्पर्शाशी, 
वाऱ्यावरून येणाऱ्या धुंद गंधाशी,
उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांशी
अन् हो, कोसळणाऱ्या जलधारांशी...!
Connect होता आलं पाहिजे,
भुकेजलेल्या भिकाऱ्याशी,
गरीब पण स्वाभिमानी विद्यार्थ्याशी,
आणि दुखावलेल्या एकाकी स्त्रीशीही...
Connect होता आलं पाहिजे,
एखाद्या जखमी जनावराशी सुद्धा...
तरच Connect होऊ आपण,
त्या सर्वशक्तिमान जगन्नियंत्याशी....!
✍️ सुजाता

मीच माझा सखा

हे बरे झाले, देवा, दिला अंधार तू इतका मला....
वाट माझी शोधावया, झालो मी स्वतः दिवा...!
काटेरी वाटेवरूनी मी, चाललो एकटा असा....
स्वतःच बनलो ऊर्जा, अन् झालो मी माझा सखा !
✍ सुजाता

Good, i was lost in the middle of Darkness, alone....
I could BE my own Light !
I got the strength to Fight !
Singing my own Song in the Starry night....
Keeping all the worries, out of sight.
Confident to win the War like a Knight.
Flowing with the wind, enjoying my Flight....!!
✍ sujata

slow death

धीमं मरण !.....Slow मृत्यू !
अशीच कधीतरी अंधारात बसले असताना,
मी चाचपडते,
माझी सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे,
की मेलीए....
गरीब बिचाऱ्या भाजीवालीशी मी जेव्हा घासाघीस करते,
भरपेट जेवल्यानंतर, एखाद्या भुकेल्या भिकाऱ्याला दुर्लक्षून जेव्हा मी पुढे जाते,
पेपरमधल्या रेपच्या,खूनाच्या किंवा आत्महत्येच्या बातम्या वाचून, हळहळण्याऐवजी,
जेव्हा मी हळूच सुस्कारा सोडते, की त्यात "माझं" कोणी नै,....
तेव्हा तेव्हा, माझी सद्सद्विवेकबुद्धी 
कणाकणाने मरतच तर असते....
माझ्या AC कारमध्ये असताना, मी जेव्हा रस्ता ओलांडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करते,
किंवा शक्य असूनही Car Pooling टाळते,
देशातील भ्रष्टाचारावर जेव्हा निर्विकार पणे राजकारण्यांना दोष देते,
अश्याच आणखी बऱ्याच वेळा, आपला काही संबंध नसल्यासरखी वागते,
तेव्हा तेव्हा माझी सद्सद्विवेकबुद्धी कणाकणाने मरतच असते,
नव्हे, मीच तिला मारत असते....!
✍️ सुजाता

स्वसंवाद

खूप बोलले आजवर.... 
आता " ऐकणं " शिकतेय् ....
वाद घातले इतरांबरोबर, आता
स्वतःशी  "संवाद"  साधतेय्.
मी React करते, का Respond,
त्रयस्थ होऊन "जोखतेय्" .....
खूप नमूने बघितले आतापर्यंत, आता
स्वतःतच "डोकावून बघतेय्... !!
✍ सुजाता.

Friday, August 28, 2020

श्वास

" श्वास "

" श्वासावर लक्ष केंद्रित करा " योगा टीचरनी सांगितलं, आणि माझं लक्ष, श्वासाऐवजी "श्वास"
या शब्दावरच केंदित झालं....
"श्वास" ! जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला अखंड सोबत करणारा, rather, ज्याची सोबत संपल्यावरच मरण येतं, असा, "श्वास" !
जन्मणा-या बाळाने पहिलं "टॅ हॅ" केलं नाही, म्हणजेच श्वास घेतला नाही, तर मोठयातला मोठा Gynecologist सुद्धा पालकांइतकाच धास्तावतो. असा हा श्वास.
असं म्हणतात की माणसाचं आयुष्य हे, वर्ष- महिने यांत न मोजता "अमूक इतके श्वास" असं मोजतात ! म्हणूनतर श्वास रोखून किंवा दीर्घश्वसन करून - श्वास slow करून, योगी आपलं आयुष्यमान वाढवतात.
आपण धावत आलो, किंवा रागावलो, की आपले श्वासोछ्वास जलद होतात, म्हणूनतर १०० आकडे मोजून श्वासावर काबू ठेवायला सांगतात. शवासनात तर आपला श्वास चालू आहे, हे आपल्या स्वतःला सुद्धा जाणवत नाही.
खरंतर अव्याहतपणे, काहीही श्रम न करता, आपल्या ही नकळत, आपला श्वास चालू असतो.
मनुष्य आणि प्राणीच नव्हे, तर वनस्पती सुद्धा श्वासोछ्वास करतात, आणि जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असा प्राणवायू निर्माण करतात., ज्यामुळेच केवळ आपण जिवंत रहातो !
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या श्वासाशिवाय आपण जगू शकणार नाही, तो आपण आयुष्यभर अगदी Free, एकही पैसा खर्च न करता, घेत असतो. जीवन म्हणजे " पाणी" सुद्धा आजकाल विकत घ्यावं लागतंय्, हो कीनई.....?
✍ सुजाता.

स्वतः साठी

प्रेम-त्याग-समर्पण, 
सारं असतं स्वतः साठी,
आपण मात्र आव आणतो,
'कर्म' माझी किती मोठी !
पुण्य करा, नाहीतर पापाचा 
ब्रम्हराक्षस येईल भित्यापाठी !
सहृदयतेनी वागलं नाही, 
तर बसत जातात नात्यामध्ये गाठी,
नामसमरण करतानाही भिती दाखवते,
परमेश्वराची अदृष्य लाठी !
म्हणून म्हणते, आपण जगतो,
फक्त आणि फक्त स्वतः साठी....
कशाला मानायचं मग,
मुलांना म्हातारपणाची काठी....?!!
✍ सुजाता.

वाचू आनंदे.... Let's Read with Pleasure ! my YouTube Channel

https://www.youtube.com/user/sujatamoghe

जाग

आनंदी रहाण्याची सुरवात कुठच्याही दिवसापासून करता येते, 
फक्त तुम्हाला 'जाग' यावी लागते ......
आणि तुमच्यात ती 'आग' असावी लागते. ...
लोकांच्या तक्रारींचं आणि अपेक्षांचं ओझं 
झुगारून देण्याची हिंमत असावी लागते !
एकदा का ते झुगारून दिलं, की आपण 
पिसासारखे हलके होतो...
आणि स्वतःतच रमतो  !
मग आयुष्य खूप सुंदर होत जातं.....
-- ✍सुजाता

"स्पर्श"

 स्पर्श

"स्पर्श " म्हटलं, की पहील्यांदा आठवतो, तो आईचा स्पर्श - मायेचा ! आई- बाबांचा, ताई- दादाचा, प्रेमाचा स्पर्श. बोलणंही अवगत व्हायच्या आधी, बाळाला दुस-यांशी connect करणारा तो स्पर्श....

मग, जसजसं मूल मोठ होऊ लागतं, तसतसं त्याला इतर स्पर्शही जाणवू लागतात. रागाचा स्पर्श, ढकलण्याचा - नाकारण्याचा स्पर्श..

आणि वयात येणा-या मुलींना, हल्ली तर मुलांनाही, एक नवीनच स्पर्श अनुभवायला येऊ लागतो -- किळसवाणा, नकोसा वाटणारा, घृणा उत्पन्न करणारा स्पर्श....! मग ट्रेनिंग मिळतं, ते प्रत्यूत्तर करणा-या स्पर्शाचं ! "No" म्हणणारा, नकार देणारा, ठाम ! तो पण स्पर्शच !

पुढे, वय वाढलं, की हवाहवासा वाटणारा स्पर्श, नवथर तारुण्याचा....नवीनच जगात घेऊन जाणारा, स्वप्नाळू, तरीही आश्वासक, असा स्पर्श.

नंतर मिळतो, तो द्यावा - घ्यावा, असा, आधाराचा स्पर्श. साथ देणारा, धीर देणारा... शाब्बासकी देणारा स्पर्श ! 'तू पुढे हो, मी तुझ्या पाठीशी आहे,' असा, मनोबळ वाढविणारा, पाठीवर थाप देणारा, आत्मविश्वास वाढवणारा, स्पर्श !

म्हातारपणीचा थरथरत्या हातांनी आशिर्वाद देणारा स्पर्श....आणि त्या सुरकुतलेल्या हातांनी आधार देणारा, सावरणारा, एक तारूण्याचा स्पर्श.....!

पण सर्वांत शेवटी होतो, तो अटळ असा स्पर्श, मृत्यूचा ! आणि त्या प्रियजनाच्या थंङगार, चेतनाहीन हाताला केलेला स्पर्श.... अंगावर शहारे आणणारा....!

पण, या सर्वांच्या ही वर, जन्मापासून मृत्यूपर्यंत पुरणारा, "त्या" अदृश्य शक्तीचा, देवाचा स्पर्श.... जो फक्त जाणवतो, कधी 

वा-याच्या झुळूकीतून, तर कधी पांवसाच्या धारांतून,.....त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचा स्पर्श.....जो जाणवतो सर्व सुख दुःखाच्या प्रसंगांत.....

✍ सुजाता.