Friday, October 30, 2020

माहेर

प्रत्येकीला एक माहेर असावे,
कर्तव्याच्या, जबाबदारी च्या जंजाळात
एक विसाव्याचे स्थान असावे,
प्रत्येकीला एक माहेर असावे.
सतत adjustment करतांना, 
स्वतः  back- stageला  राहतांना,
स्वतः चा Preference जपणारी 
एक   Space  असावी,
प्रत्येकीला एक माहेर असावे.
अष्टौप्रहर झटताना, 
दुसऱ्याचा विचार आधी करतांना,
आपलंही मन जपणारं कोणी असावे,
सारखं कामात व्यस्त असताना,
विरंगुळ्याचे चार क्षण मिळावेत,
यासाठी तरी, प्रत्येकीला माहेर असावे.
आणि ज्यांना असे माहेर नाही, 
त्यांच्यासाठी आपणच माहेर व्हावे....
पण प्रत्येकीला माहेर असावेच !
✍️ सुजाता 😌

Thursday, October 29, 2020

कोजागिरी

को जागर्ती ....? अर्थात "कोजागिरी" !
"जागण्याचा" महोत्सव.....
जागे होण्याचा, भानावर येण्याचा उत्सव
मी खरी कोण आहे....?
 माझे खरे " स्वरूप" काय...?
माझ्या जगण्याचे प्रयोजन काय....??
coexistence.... correlation....!
सहसंवेदना...... सह अनुभूती....
सौंदर्य आणि शांती, आनंद आणि तृप्ती,
यांच्या समन्वयाची अनुभूती....!
सृजनशीलतेची सजगता जी जागी करी,  ती खरी कोजागिरी.....!!
चंद्रशलाका अमृताचा वर्षाव करी !!
✍️ सुजाता 🌕

मी

हे बरे झाले, देवा, दिला अंधार तू इतका मला....
वाट माझी शोधावया, झालो मी स्वतः दिवा...!
काटेरी वाटेवरूनी मी, चाललो एकटा असा....
स्वतःच बनलो ऊर्जा, अन् झालो मी माझा सखा !
✍ सुजाता

Good, i was lost in the middle of Darkness, alone....
I could BE my own Light !
I got the strength to Fight !
Singing my own Song in the Starry night....
Keeping all the worries, out of sight.
Confident to win the War like a Knight.
Flowing with the wind, enjoying my Flight....!!
✍ sujata

Wednesday, October 21, 2020

मोक्ष

कृष्णाचेच  दुसरे नाव "सच्चिदानंद"....!
 सुख आणि दुःख दोन्ही निरर्थक....
 जे मी स्वीकारते ते सुख,
 आणि जे मी नाकारते ते दुःख....!
सुख आणि दुःख हे आनंदाचे विभाजक.
आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही ....
जसे "सुख" च्या विरुद्ध "दुःख" ....
"प्रेम" च्या विरुद्ध  "द्वेष",
"स्वर्ग"  विरुद्ध  "नरक" .....
पण "आनंद" च्या विरुद्ध काहीच नाही !
कारण 
आनंदाच्या विरुद्ध काही नाहीच...!
"सच्चिदानंद" म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही समावेशक....
आणि "मोक्ष" म्हणजे तरी दुसरे काय "स्वातंत्र्य" ..... किंवा "मुक्तता"....!
मोक्ष म्हणजे सुख आणि दुःख 
दोन्हीचा समभाव....
"मोक्ष" म्हणजे कसलाच नाही  "अभाव"

Tuesday, October 20, 2020

चूल, मूल,अन् संसार पाश,
यांत गेले किती तरी दिवस,.....
तारुण्यात ऑफ़िस - करियरचा ध्यास
वेळ नसे घ्याया, मोकळा श्वास .
नाटक,सिनेमा,मौज अन् प्रवास....
तरीही वाटे काही उदास ....।
समाजऋण फेडायाची आता लागे आंस....
सोड़ण्याआधी शेवटचा नि:श्वास !
 -- ✍️सुजाता

Monday, October 19, 2020

सद्चिदानंद

कृष्णाचेच  दुसरे नाव "सच्चिदानंद"....!
 सुख आणि दुःख दोन्ही निरर्थक....
 जे मी स्वीकारते ते सुख,
 आणि जे मी नाकारते ते दुःख....!
सुख आणि दुःख हे आनंदाचे विभाजक.
आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही ....
जसे "सुख" च्या विरुद्ध "दुःख" ....
"प्रेम" च्या विरुद्ध  "द्वेष",
"स्वर्ग"  विरुद्ध  "नरक" .....
पण "आनंद" च्या विरुद्ध काहीच नाही !
कारण 
आनंदाच्या विरुद्ध काही नाहीच...!
"सच्चिदानंद" म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही समावेशक....
आणि "मोक्ष" म्हणजे तरी दुसरे काय "स्वातंत्र्य" ..... किंवा "मुक्तता"....!
मोक्ष म्हणजे सुख आणि दुःख 
दोन्हीचा समभाव....
"मोक्ष" म्हणजे कसलाच नाही  "अभाव"

Tuesday, October 13, 2020

तू

माझ्या मनात तुझे येणे जाणे
कधी सुरू झाले नकळे .....
अगदी लहानपणी, शाळेच्या पहिल्या दिवशी 
आई हात सोडून गेली तेव्हा -
       तूच माझ्या मनांत आला होतास
आणि माझे डोळे पुसून माझ्याबरोबर
बडबडगीतं गाईली होतीस !
त्यानंतर आयुष्याचं अवघड वळण चढतांना,
         तूच माझ्या मनांत आलास,
आणि मला आश्वासक स्पर्श देऊन गेलास !
त्यानंतर माझ्या मनात आलास तू
गौरीहर पूजताना .....
आणि अनोळखी नव-याची 
जन्मोजन्मीची ओळख करून दिलीस !
त्यानंतर माझ्या मनात तुझे येणेजाणे
सतत चालूच आहे ......
लेकाच्या आजारपणांत रात्री जागताना,
         लेकीच्या यशात आनंदून हंसताना,
संसाराच्या सारीपाटात चढउतार सोसताना..
चहाच्या पेल्यातील वादळात सापडताना ....
माझ्या मनात तुझे येणे जाणे 
सतत चालूच आहे .
आता एकच मागणे आहे,
आता आयुष्याच्या उतरणीवर
माझ्या मनात तू येशील तेव्हा,
             "जाणे" रद्द कर.
अगदी माझेच या जगातून "जाणे" होईपर्यंत !
माझेच या जगातून जाणे होईपर्यंत !!
 ---- ✍️ सुजाता.

Sunday, October 11, 2020

पिकलं पान

अरे पिकल्या पाना,....
गळून पडणार म्हणून
का उगां खंतावतोस मनां ?
कधीकाळी नाजूक कोंब बनून,
तू वटवृक्षाची सुरूवात केलीस,
हिरवं गार पान बनून वाटसरूला
तुझयापरीने सावली दिलीस.
बहरानंतर पानगळ येणार,
हा ऋतुचक्राचा नियम असतो,
परिपक्वपणे गळून जायला,
मग तू का एवढा विरोध करतो ?
कदाचित गाणाऱ्या वाऱ्यासंगे
तू तरंगत जाशील....
कदाचित पाण्यावर पडून एखाद्या
मुंगीचा जीव वाचवशील....
रंगीत फुलांबरोबर कदाचित
गुच्छामध्ये गुंफला जाशील.
किंवा 'पत्री' बनून देवाच्या
चरणांवर वाहिला जाशील....
एखादा रसिक, वहीत ठेवून
तुला जाळीदार बनवेल,.....
कशावरून, गळून पडल्यावर
आयुष्य तुझं उजाड बनेल ?
झाडाचा Comfort Zone सोडण्यातच
आहे तुझं भलं, खरं !
आणि हे तुला, लवकरात लवकर
उमगलं, तर बरं !!
✍️ सुजाता 🍂