Thursday, April 7, 2022

मैत्रीचे झाड

माझ्या अंगणी आहे एक झाङ मैत्रीचे....
बीज पेरियले होते मी, सु - संवादाचे.
प्रेमाचे खत, आणि आत्मियतेचे पाणी,
गैरसमजाचे तण काढून, केली निगराणी.
झाड वाढले सुंदर, छाया ही मिळाली,
आयुष्यभरीच्या एकटेपणाची चिंताच पळाली !!
👏 सुजाता 😀

Tuesday, April 5, 2022

गुढीपाडवा

नववर्षाची  ऊभारू गुढी,
काढून टाकू मनातली अढी !
सद्विचारांचे  बांधू तोरण ,
आनंदात जावो आपला प्रत्येक क्षण.
नवीन वर्षाची नवी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी वाट....
पूर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा 
गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा  !!
✍ सुजाता.

Friday, April 1, 2022

आरसा

चेह-याप्रमाणे 'स्वभाव' दाखवणारा
'आरसा' कुठे मिळेल का ?
मत्सर - ईर्षा- राग यांचा 'पारा'
कुणी दाखवेल का ?
अंतरंगातली 'कुरूपता'
स्वतः ला तरी दिसेल का ?
करून 'पूजा अर्चा '
वागणं कधी सुधरेल का ?
तरी मला वाटतं, 'नाम' घेताघेता,
'मी'पणा थोडा 'गळेल' ना....??
✍सुजाता