"भूतकाळात" रमणं, हे नेहमीच नसतं
औदासिन्याचं लक्षण....
"वर्तमानात"ल्या तापांवर , ते करतं
आनंदाची पखरण !
"भविष्यकाळ" ही सुसह्य करतं
गतायुष्यातली आठवण....
"Nostalgia" नेहमीच करतं
"Depression" पासून संरक्षण !!😙
✍
Saturday, June 24, 2017
Nostalgia
शायरी
अच्छा हुआ मुझे मिलन नहीं, जुदाई मिली....
मिलके बिछड़नेका गम नहीं ।
ना मिले नसीब में फूल, कांटें ही सही,
काटोंको मुरझाने का खोंफ नहीं ।
ए मुहोब्बत, तेरा शुक्रिया ,....
सपनों में खोने का मौका दिया,...
चाहत और यादोंका मजा चखाया....
नीरस होता जीवन, तेरे बिना,....
कामयाब ना सही, अधूरेपन में जीना सिखाया ।
Monday, February 13, 2017
मन आणि शरीर !
"मन आणि शरीर "
शरीर माझं पन्नाशीच्या पलीकडे गेलंय....
मन मात्र अजून, पंचवीशीतच रेंगाळतंय !
पहिल्या पावसाच्या गंधानी, मन फुलारतं....
पण शरीर चिखलाच्या अन् ट्रॅफिकच्या
विचारानीच थबकतं....!
पक्षांच्या किलबिलाटावर, फुलपाखरासंगे
मन माझं नादावतं,
तर, लोकं काय म्हणतील, यावर विचारांनी
शरीर धास्तावतं ।
झाकीरच्या तबल्यावर, किशोरीच्या सुरात
मन गिरक्या घेतं,....
बिच्चारं शरीर मात्र, पावलातच अड़खळतं....
मग मात्र शरीराला मी खुर्चीतच बसवते,
आणि मनाला मुक्त आकाशात भरारी घ्यायला पाठवते !
✍सुजाता.
एकांत .....आणि एकटेपणा .....
एकटेपणा ....आणि एकांत
एकटेपणा या जगातील सगळ्यात मोठी शिक्षा आहे....आणि एकांत, सगळ्यात मोठे वरदान !
या दोन सारख्या दिसणाऱ्या शब्दांमध्ये आकाश- पाताळाएवढा फरक आहे.
एकटेपणा माणसाला घाबरवतो,.... तर एकांत, श्रांत करतो !
एकटेपणा अस्वस्थता निर्माण करतो, तर एकांत
मनःशांती !
जेव्हा आपण बाहेरच्या जगात बघतो, तेव्हा एकटेपणा जाणवतो,....पण तीच नजर स्वतः मध्ये वळवतो, तेव्हा एकांत अनुभवतो !
हे जीवन म्हणजे सुद्धा दुसरे तिसरे काही नसून, "एकटेपणातून एकांताकड़े " केलेला प्रवास आहे ! त्या प्रवासातले प्रवासी पण आपण आहोत, आणि अंतीम ध्येय पण आपणच आहोत !!
✍ ओशो
एकांत
एकटेपणा ही शिक्षा, तर एकांत, एक वरदान !
एकटेपणा घाबरवतो, तर एकांत करतो शांत !
एकटेपणातील अस्वस्थतेवर एकांत करतो मात !
आयुष्य म्हणजे एकटेपणातून एकांताकड़े केलेला प्रवास....!
✍सुजाता
This is it !
This is it ! & it is Perfect !!
I don't need to Change or Fix anything.
Now, at this very moment, I take the
Responsibility of my Life.
I keep the Past in the Past. My Future was Stuck in the past. I had Complaints, Grudges & Sufferings in my Past. I looked at People & Surroundings not as they are, but as they Occur to me. I was looking through my Perspective !
I had forgotten that I have Power in me. I am a Powerful person having power to live a pow
erful Life, & a life that I Love !
But now, I have to Remember it, Rediscover it, I Remake Myself !
I don't Blame Myself , or my Circumstances, for my Thinking. Because, I m NOT what I Think, or Feel....., but
I am what I Say.....! & what I Do !!
I am Complete in Myself !
I am Creating a World of Possibilities !
I Accept Myself, & other People , as they Are !
Who I am right now, there is a Possibility of Being Happy & Peaceful !
I may again Dwell in my Past, of Complaints, & Grudges & Sadness,....
But, now, I Know, I am capable of taking Responsibility of creating again, the Possibility & Power, to live a Happy & Peaceful Life,....a life that I love !!
There is an on-going Opportunity of creating my World of Possibilities of
Love....& caring,
Fulfillment...& Satisfaction,
Forgiveness...& Acceptance....!!
I know, Being Quiet & Listening, Empowers me !!
✍sujata
You Dhanu.....
You, Dhanu.....
Kids I have two....
But you Understand me so well,
That I'm Attached to you !
You helped me to Prove,
To this World,& my Mind,
That I'm Capable of giving Birth
to a Normal Child !
You helped me to Flow
My Intelligence & Sensitivity,
Further beyond me....
& remove my complex of Inferiority !
You showed me the World of
"Gay" & "Happiness"....
Else I would've remained in
"Pity" & "Loneliness"....!
You make me Proud,
Y make me Complete !
My Blessings r with you, till the end,...
'Cause, you r my Lovely Friend !!
✍sujata
माझा Valentine Day
माझा *Valentine Day*....
फक्त माझ्या शब्दाखातर, माझ्यावर विश्वास दाखवून, जेव्हा माझे मित्रमैत्रिणी - सगे सोयरे,
माझ्या सोशल कार्याला भरभरून मदत करतात, त्यासाठी लांबून येतात, तोच माझ्यासाठी *Valentine Day*....!
मी फोन करताच, मला काय सांगायचंय, हे ओळखणा-या माझ्या सख्या ह्याच माझ्या *Valentine* !!
मी गावाहून आले,की माझा मुलगा धावत माझ्या जवळ येतो, तो माझा *Hug Day* ...!
तिला सर्वात आवडणाऱ्या Dark -Chocolate चा तुकडा जेव्हा माझी लेक मला देते, तोच माझा *Chocolate Day* !!
आणि देव पूजेसाठी फुलं तोडताना, मला आवडणारं एखादं फूल जेव्हा माझा नवरा झाडावरच राहू देतो, तो खरा माझा *Rose Day* !!
मला वेगळा Mother's Day किंवा Sister's Day साजरा करायची गरजच भासत नाही.
असे दिवस माझ्या आयुष्यात वारंवार येतात.... आणि माझा रोजच Happy Day बनवतात.
आणि मला विश्वास देतात की माझा शेवटचा दिस सुद्धा *"गोड़"*च होणार .....!!!
I wish you alllll, alongव with Myself, a Happy *"Every -Day"* !!💖
✍ सुजाता 🙋
Sunday, January 1, 2017
गुरुकिल्ली
काम -क्रोध -लोभ,मद -मोह -मत्सर
या "षड़्रिपूंना" हाकलावे सत्वर....
श्रद्धा आणि सबुरी, सुख -शांती -समाधान
या "पंचमित्रांचा " ठेवावा मान !
हीच आहे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली,
हे मला नुकतच उमगलंय् हल्ली 😊
✍सुजाता.
