एकटेपणा ....आणि एकांत
एकटेपणा या जगातील सगळ्यात मोठी शिक्षा आहे....आणि एकांत, सगळ्यात मोठे वरदान !
या दोन सारख्या दिसणाऱ्या शब्दांमध्ये आकाश- पाताळाएवढा फरक आहे.
एकटेपणा माणसाला घाबरवतो,.... तर एकांत, श्रांत करतो !
एकटेपणा अस्वस्थता निर्माण करतो, तर एकांत
मनःशांती !
जेव्हा आपण बाहेरच्या जगात बघतो, तेव्हा एकटेपणा जाणवतो,....पण तीच नजर स्वतः मध्ये वळवतो, तेव्हा एकांत अनुभवतो !
हे जीवन म्हणजे सुद्धा दुसरे तिसरे काही नसून, "एकटेपणातून एकांताकड़े " केलेला प्रवास आहे ! त्या प्रवासातले प्रवासी पण आपण आहोत, आणि अंतीम ध्येय पण आपणच आहोत !!
✍ ओशो
एकांत
एकटेपणा ही शिक्षा, तर एकांत, एक वरदान !
एकटेपणा घाबरवतो, तर एकांत करतो शांत !
एकटेपणातील अस्वस्थतेवर एकांत करतो मात !
आयुष्य म्हणजे एकटेपणातून एकांताकड़े केलेला प्रवास....!
✍सुजाता

No comments:
Post a Comment