Sunday, December 11, 2016

नव वर्ष

नव वर्षाचा  संकल्प....
इतरांप्रमाणेच मीही नवीन वर्षाचा संकल्प करायचे....रोज ड़ायरी लिहायची,  लवकर उठायचं, exercise करायचा, dieting करायचं,...वगैरे वगैरे,...आणि 7-8  दिवसांत  मोड़ायचेही....!
या वर्षी  विचार करताना वाटलं, की काहीतरी वेगळं करावं....
आत्ताचं गेलं वर्ष,  वळून बघताना, मनात आलं,की कसं गेलं हे वर्ष....? काही  दुःखाचे, अगदी आयुष्य  उध्वस्त करणारे क्षण  या वर्षभरात येऊन गेले,  पण जमाखर्च मांडायचा झाला, तर सुखाची, आनंदाची  बाजू जराशी जड़च  भासली....
माझी लाडकी लेक ड़ाॅक्टर झाली, आणि मुंबईतच J. J. Hospital मध्ये internship  करायला लागली....
कित्येक नव्या ओळखी झाल्या...Rotary,  सखी मंड़ळ,  'कुसुमाग्रज प्रतिष्ठान .....
नवीन  "दालनं" खुली झाली....
माझ्या  व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याची  संधी मिळाली !
माझ्या आयुष्याची  "second inning" सार्थकी लावणारा  माझा  "स्वामी आधार वर्धिनी आश्रम".....समाजाचं  "ऋण" फेडण्याची संधी मिळाली....
आयुष्याला काही ध्येय मिळालं,
जगण्याला अर्थ मिळाला,
जीवन समृद्ध झालं....
तप्त ऊन्हानंतर आलेल्या  पावसाच्या  हलक्या  सरीलाही  किती किंमत असते,  ते जाणवलं.
मन एवढं Mature झालं नसलं, तरी Process तरी  सुरू झाली .....
आवडत्या कामात स्वतःला झोकून देणं, म्हणजे सुद्धा  "Meditation" ! ही नवी व्याख्या  समजली....
कवितेतून स्वतःला शोधायला लागले...
धडपडत,  अडखळत,  स्वतःलाच  सावरत पुढे जायला  शिकले. स्वतःच्या मर्यादा ओळखायला  आणि इतरांच्या  स्विकारायला शिकले....
"त्याचं" अस्तित्व  छोट्या छोट्या  गोष्टीत जाणवायला  लागलं, माझी  'बाग', निसर्ग,  आणि आवडती  'गाणी'  यात  रमायला लागले,
म्हणजे जणू, मीच मला भेटले, मीच माझ्याशी  'मैत्री '  केली !
असं जाणवलं, की आपण चांगल्या गोष्टींचा विचार केला, की जास्त चांगलं घड़ायला लागतं....The Law of Abundance !
आता मी ठरवत्येय की रोज एकतरी चांगली घडलेली घटना , आनंदाचा प्रसंग  लिहून ठेवायचा !  बघताबघता आनंदी क्षणांचा  साठाच जमा होईल की,.....आणि पुढलं वर्ष संपताना, हा आनंदाचा  "ठेवा" मला आणखी समृद्ध  करेल....
मात्र हा 'संकल्प'  मोडू न देण्याचाही  संकल्प करायला हवा !😀
--✍सुजाता.

Thursday, December 1, 2016

गोड़ बोलणे

          "गोड़ बोलणे"
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्
न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।
नासत्यं च प्रियं ब्रूयात्
एष धर्मः सनातनः ॥

खरं बोलावं, गोड़ बोलावं...
कटू सत्य बोलून कशास कुणा दुखवावं ?
आणि खोटं कितीही गोड़ वाटलं,
तरीही ते न बोलावं .....।।

गोड़ बोलण्याने इतरांना सुख मिळते. चार गोड शब्द बोलायला पैसे पडत नाहीत, तरीही माणूस एकमेकांशी बोलताना गोड बोलत नाही. हृदयात जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, माया, ममता, असेल, 
तर सहजपणे आपण गोड़ बोलतो.  इतरांना समाधान देण्याचे सामर्थ्य करोडो रुपयांच्या आर्थिक ताकदीतही नाही. ती ताकद चार गोड शब्दात मात्र खचाखच भरलेली असते.
बोलण्यामध्येही निर्हेतुक प्रेम असेल,बोलणं हे हळू, नम्रस्वरात, साधं, सहज, आपुलकीचं, आणि प्रसन्न
असेल, तरच ते सहजसुंदर 'गोड़' बनते. अशी माणसं सर्वांची आवडती होतात, सर्वांना हवीहवीशी वाटतात.
पोटी स्वार्थ ठेवून 'गोड़' बोलणारे  लोकही जगात भेटतात. आपलं काम साधून घेण्यापुरते काही लोक प्रेमाने वागतात. तसं नसावं.  ते 'कृत्रिम, व  'दिखाव्याचे'  गोड़ बोलणे झाले. अशी 'नाटकी' गोड़ माणसं कालांतराने आवड़ेनाशी होतात. 

आपले बोलणे अगदी गोड असावं याचा अर्थ नेहमी स्तुतिपरच बोलावं असे नाही. एखाद्याकडून खरंच काही चूक झाली असेल तर त्याला चारचौघात न बोलता स्वतंत्रपणे एकांतात, विश्वासात घेऊन शांतपणे समजावून सांगावं , हेही एक प्रकारचं गोड बोलणंच आहे.

गोड़ बोलणं, ही एक कला आहे, इतर सर्व कलांसारखीच तीही जन्मजात असते, आणि 'रियाज' करून ती जोपासावी लागते !
गोड बोलल्यावर लगेच डायबेटीस होत नाही तसेच डायबेटीस ऑलरेडी असेल तरी गोड खायला बंदी असते बोलायला नाही हे ठाऊक असूनही माणसे गोड बोलायला कचरतात.

गोड बोलणे हे, "आभासी" ( whats appवर, फेसबुकवर ) नेहमीच सोपं असतं....! व्यक्ती आणि तिच्यामुळे निर्माण होणार्‍या समस्या आपल्यासमोर आल्यावरही आपल्या मुखातून गोड शब्द बाहेर येणे हा संस्कार रक्तात भिनवणे तशी साधी गोष्ट नाही. यासाठी जिभेला वळण लावण्याचीही एक तपश्चर्याच करायला हवी !

-- ✍सुजाता मोघे. शिवाजी पार्क,  मुंबई.
         ( 9821223939 )

Tuesday, August 23, 2016

कृष्ण

दुनियेच्या या मायाजाली, षड़रिपूंचा कंस मारणारा
अन्यायाचा  अधम कालिया- मर्दणारा, 
कौरवांच्या या जगात, कर्मरथाला सारथ्य देणारा,
वासनांधांपासून अबला पांचालीचं शील रक्षणारा
रंजल्या-गांजल्यांवर  नवआशेचा गोवर्धन पेलणारा
           कृष्ण
तुझ्या-माझ्यातच  निर्माण  होवो,....
हीच या  कृष्णजन्माष्टमी निमित्त   शुभेच्छा  !!
-- सुजाता.

Friday, July 22, 2016

मुलगी वाचवा ....

✔ मुलगी वाचवा...
मुलगी वाचवा ... मुलगी वाचवा .. ..
कशाला  वाचवा...?
आणि  कुणाकुणापासून  वाचवा ....?
गर्भातच  गळ्याला नख
लावणाऱ्या  आईबापांपासून  वाचवा....?
की बालवयात तिचं  शोषण 
करणाऱ्या  आप्तजनांपासून  वाचवा ...?
अल्पवयातच पाशवी बलात्कार
करणाऱ्या  'जात्यांधांपासून '  वाचवा ...?
हवे त्या शाखेत शिक्षण मिळण्यापासून
वंचित करणाऱ्या शिक्षण संसथेपासून  वाचवा..?
की हुंड़यासाठी  छळ करणाऱ्या
सासरच्यांपासून  वाचवा ...?
कुणाकुणापासून  मुलगी  वाचवा....
आणि कसे वाचवा ? कुठपर्यंत  वाचवा ...??
जोपर्यंत,  मुलगी स्वतःच  'वाचून' 
स्वतःला वाचवेल,....
स्वतःचं  नशीब  स्वतःच   'लिहून '
सटवाईला  वाचायला लावेल,....तोपर्यंत...!
खरंतर मुलगीच जगाला,
अंतीम विनाशापासून  वाचवेल .....!!
--✏सुजाता

Sunday, July 10, 2016

साथ

   हा प्रवास  कधी संपूच  नये,
   मंजिल कधी येऊच नये !
   तुझी साथ फक्त या वाटेपुरतीच असेल तर
   ही  वाट कधी  सरूच  नये.....
   तू  स्वप्नातच  आला असशील, तर
   मला  जाग  कधी येऊच  नये,..
   हा  केवळ  भासच  असेल  तर,
   मी  वास्तवात  कधी  जगूच  नये....!!

Tuesday, June 28, 2016

पावसाळे.....

माझ्या आयुष्यात  किती  पावसाळे  आले  ?
त्यापेक्षाही  महत्त्वाचे , मी त्यात किती भिजले ?
किती   विकारांच्या  आधीन  झाले ....?
किती विचारांना  पाॅझिटिव्ह  बनवले ...?
किती जणांना दुखवले...., दुरावले...
किती वेळा हर्ट  झाले, तुटले,  कोसळले...!
पण जर सावरले,  सुधारले, परिपक्व झाले,
तरच खरी तुझ्या कृपा-  वर्षावात न्हाऊन  निघाले !

Friday, June 24, 2016

कधी वाटतं....

️💭☔️

️कधी वाटतं पाऊस व्हावं....

आणि आवेगानं धरतीच्या कुशीत शिरावं,

हळुवारपणे फुलांवरती टपटपावं......

कधी वाटतं पाऊस व्हावं

शाळेतल्या मुलांच्या रेनकोटमधून

चिखलाच्या खड्ड्यात डान्स करावा....

     आणि कुणा   लाजाळू प्रेमिकांना

 एकाच छत्रीत आडोसा घेण्याचा चान्स द्यावा

कधी वाटतं पाऊस व्हावं...

एखाद्या कातरवेळी कुणा विरहीणीच्या

डोळ्यांमधल्या अश्रूंमध्ये एकरूप व्हावं

कधी वाटतं पाऊस व्हावं

आणि आयुष्याच्या संध्याकाळी

पागोळ्यांमधून आयुष्याचा पट उलगडून बसावं !

                                                            -- सुजाता

$E₦Ŧ ₣ƦØM $UJλŦλ'$ łPλÐ

Thursday, June 23, 2016

माणसं .....

हल्ली पुस्तकं वाचणं  सोडूनच दिलंय  मी...
हल्ली  माणसंच  वाचत असते मी ...
काही काही, पुन्हा  पुन्हा वाचाविशी वाटतात,
समजून घ्यावीशी ......
काही नव्याने  कळतात.
काही अगम्य,  दुर्बोध,
अर्धवटच सोडून द्यावीशी....
पण किती  प्रकार.... किती  तऱ्हा...
काही सोपी, लघुकथेसारखी,
तर काही किचकट,  नवकथेसारखी.
काही  बोअरिंग... कादंबरीसारखी.
तर काही इंटरेस्टिंग,  रहस्यकथेसारखी .
पण तरीही ,  हरएक,  वेगवेगळी....!
काही पुस्तकं, - अहं - माणसं,
दुःखी  करतात,  तर काही,  अंतर्मुख....!
आता , मला  'स्वतःलाच'  वाचलं  पाहिजे एकदा,
चष्मा माझा साफ करून घेतला पाहिजे एकदा ...!!
--सुजाता.

Wednesday, June 22, 2016

आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा पाऊस

"आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा पाऊस "

बालपणी पाऊस येतो,

      होड्या घेऊन अंगणात.....

शाळेला सुट्टी, मैत्रिणींशी मस्ती,

वेळ जातो एकमेकांना भिजवण्यात !

तरुणपणी पाऊस येतो,

       हुरहुर घेऊन मनांत.....

स्वप्नातल्या राजकुमाराबरोबर

    भिजवतो एका छत्रीत !

लग्न झाल्यावर पाऊस आणतो

        आजारपणाची भिती,

मुलांसाठी Vicks, ह्यांच्यासाठी भजी,

        ह्यातच वेळ जातो किती !

प्रौढपणी पाऊस म्हणजे

     गाड्या बंद, आणि धास्ती.....

मुलं, सुना, नातवंड उशीरा येती, लाईट्सही जाती !

      पण .... लागता नेत्र पैलतीरी,

हाच पाऊस आणतो 'त्याची' कृपादृष्टी .....

       त्याच्या कृपेच्या वर्षावात न्हाऊन घ्यावं,

आता कशाला कुणाची भिती ?!!

 -- सुजाता

Sent from Sujata's  iPhone

Tuesday, June 21, 2016

पाऊस

गड़गड़ाटाचा  ढोल  वाजवीत आला, .....
मनमोराचा पिसारा  फुलवीत आला .....
धरित्रीची  तृष्णा  शमवीत  आला ....
बळीराजाच्या  आशा  फुलवीत आला !!

Monday, June 20, 2016

पाऊस.....

तू, मी, अन्  पाऊस ...
खूप वाट पाहिली,  आता नकोच  जाऊस .....
भिजूदे  तन-मनाला, छत्री नको  घेऊस....
तृप्त कर मला,  जगाला नको  भिऊस...!
तू , मी , अन्  पाऊस ....!!

इंद्रधनू. ....

धरणीला भिडतो पाऊस, तेव्हा
आकाशातच  राहतं ' इंद्रधनू '.....
पण, न रुसता, घेऊन त्याची
' रंग ऊधळण्याची जादू,
स्वतःतूनच रंग-गंध अन् आकार फुलवून,
बहरते तिची तनू .....!!

Monday, June 13, 2016

कान्हा......

"तुझ्याशिवाय रंगांनाही 'रंग ' नाही कान्हा ......."
आयुष्य झाले रंगहीन, तू रंग भराया ये ना.....
आतातरी संपव हा विरह जीवघेणा....
नको ना रे छळू असा तू पुन्हा पुन्हा.....

तेरे बिना, खुशबू नहीं फुलोंको,
             खूबसूरती नहीं तारोंको,
              खुमार नहीं रंगोंको,  कान्हा,
जिंदगी बेरंग है, तुम रंग जमाने आना...।

आई .....

प्रेममयी, वात्सल्यरूप,त्यागमूर्ती आई....
कधी तिच्या भावना कोणी समजून घेई  ?
गृहीत धरून तिला जो तो विसरून जाई. ...
तुझे तूच आता स्थान निर्माण कर ग बाई  !!

मला काय हवंय

✔शाळेतून काढताना , लग्न करून टाकताना
आईवडिलांनी नाही विचारलं"मला काय हवंय"
करिअर सोडताना, संसारात रमताना
नव-यानी नाही जाणून घेतलं"मला काय हवंय"
मुलबाळांचं करताना, स्वतःची हौस मारताना
मी स्वतःच विसरले "मला काय हवंय "......
आता,आयुष्य संपताना,छोटेछोटे आनंद घेताना
माझं मलाच उमगलं , " मला काय हवंय " !!

Sunday, June 12, 2016

माझं मन ....

भरुन आलंय माझं मन....,
आभाळासारखंच !
धो धो रडण्यानी
मोकळं होईल ते ही,
पसरेल त्यावर
समाधानाचे ऊन्हं
आणि उमटेल स्मिताचं इंद्रधनू !
मग वाईट कसं रडणं ?
ते तर गरजेचंच,
माझ्या मनाच्या मशागतीसाठी !!

Saturday, June 11, 2016

पुलं .....

मैत्री.....

मैत्रीचं नाव काय ठेवू ?
 'स्वप्न' ठेवलं तर अपूर्ण राहील..
'मन' ठेवलं तर कधीतरी तुटेल,
   मग विचार केला की 'श्वास' ठेवू
  म्हणजे मरेपर्यंत 'सोबत' राहील..

इस   दोस्ती   को   क्या   नाम   दूं.....
" ख्वाब"    रखूं,   तो   अधुरी   रहेगी....
"दिल"  रखूं ,  तो   टूट   जाएगी....
फिर    सोचा    "सांस"    रखूं ....
आखरी   दमतक   साथ  तो   रहेगी...।

जखम

जखम झाली तनूला तर येते लवकर भरून,पण
जखम झाली मनाला तर भरून येणे कठीण ।
शरीराच्या जखमेवरचे औषध असते मोठे,
पण मनावरच्या जखमेवर औषध मिळते कुठे ?
-- सुजाता

Friday, June 10, 2016

💦पाऊस 💦

💦नव्या घरातला पहिला  पाऊस ....
Temporary घर, पण  'चिरतरुण'  पाऊस.
खूप वाट बघीतली...आता लौकर नको जाऊस...
'समृद्ध ' कर धरणीला, आता भाव नको खाऊस  !
-सुजाता.

दुःख

दुःख म्हणजे काय. ....
सुखाचा अभाव. ....
की वेदनेचा अनुभव  ?
मनाचा स्थायीभाव,
की आनंदाचा आविर्भाव. ..!?

नाती बदलत जाती .....

️नाती बदलत जाती ...

जी सतत बदलतात ना , ती  नाती  ....

ऋतू  बदलतात ,  Callander  वरची पानेही बदलतात ,

मग नाती बदलली तर एवढी खळखळ कशाला ?

ऋणानुबंधाच्या गांठी  ,

कधी नव्याने जुळतात , कधी बांधलेल्या सुटतात ,

तर कधी जुन्याच नात्यांचे पीळ बदलतात....

नातीच ना ती , बदलणारच  !

रस्तासुद्धा सरळसोट असला तर एकसूरी होऊन जातो ,

थोडी वळणं , थोडे चढउतार वाटचाल सुसह्य करतात

नदीसारखी , नातीही वळणं घेत , चढ़त उतरत ,

पुढेपुढे सरकावी लागतात ....

नाहीतर ती काँचतात , कुजतात

धागे  उभे आडवे , काही घट्ट काही पीळदार ,

काही सैलसर , space देणारे ,

आयुष्याचं वस्त्र जरतारी करतात !

-  -  सुजाता

$E₦Ŧ ₣ƦØM $UJλŦλ'$ łPλÐ

मोती .....

अश्कों के मोती युं ना बहाईए,
अपनी भावनाओंको युं ना छुपाईए,
ना मिले ममता किसी एकसे तो क्या हुवा....
जो देते हैं खुशी, उन्हें तो अपनाईए....।

सहज .....

आंसू आणि हसू ....

जीवनगाणे .....

माझे आता काही नाही तुझ्याकडे मागणे
पेरले तसे उगवणे  हेतर सृष्टीचेच देणे ।
'भोगणे' किंवा 'उपभोगणे'....
दोन्ही आनंदाने स्वीकारणे,
हेच खरे " जीवनगाणे".....!
हेच खरे "जीवनगाणे ".....!!

Thursday, June 9, 2016

परीक्षा.....

आयुष्यात संकटं घेतात आपली परीक्षा,
त्यांना भिऊन का करावी स्वतःलाच शिक्षा
इतरांकडून करू नये कसलीच अपेक्षा ....
आनंदात-मजेत, मस्तीत जगावं त्यापेक्षा  !!

अद्वैत......

🌹मी मिटता लोचन तुझीच मूर्ती दिसते....
मी पहाता दर्पण, तुझी छबी न्याहळते.
ही प्रीत म्हणू की अद्वैत म्हणावे नकळे...
जणू दोन तनू पण,आत्मे एकरूप झाले..

A Book called Life.....

🌺

प्रेम.....

प्रेम ......
धबधब्यासारखं अंगावर कोसळणारं. ....
कधी नदीसारखं शांत वाहणारं.
वादळासारखं घोंघावणारं,
तर कधी झुळूकीसारखं गुणगुणारं. ....
मनातून उमलणारं. ...
जगापासून लपणारं. ....
कुठवर माझ्याबरोबर येशील असं विचारताच
निष्पापपणे हसणारं. ....
तू कुठवर जाऊ शकशील
असं मलाच विचारणारं.....
निरागस, अढळ, अश्राप प्रेम. ....!

माझी सखी

आहे माझीही एक सखी, जिवलग अशी. ..
नाटक-सिनेमा-पुस्तक वाचतांनाही ती मला वाटते हवीहवीशी. ..
जिच्यावाचून कामे उरकते मी उदास,कशीबशी ...
अशी माझी जिवलग सखी,
ती माझी "चाळीशी "(चष्मा ) !!
😊😃😁😜

तृप्त !

हे स्वप्न म्हणू, सत्य की आभास....
तुझं अस्तित्व सतत माझ्या आसपास....
फुलातून अलग करता येईल का
कधी सुवास....
तृप्त आहे मी, आता कसलीच उरली नाही आंस !

( हे प्रियकरालाही लागू पडतं.....
अन् परमेश्वरालाही.....)



Wednesday, June 8, 2016

रखुमाई.....

मी वामांगी .....
28 युगं मीही उभी...एकाकी....
जवळ असूनही....दूर कितीतरी.....
डोळ्यांवर झापड लेऊन. ....सवईने ।
जणू फसवतेय इतरांना .....की स्वतःलाच !
युगानुयुगांची साथ असल्याचा 'भास'.
अंगावर येतो माझा सनातन एकटेपणा. ....
चौथ्या कम-यानेही भरून न येणारा..!!

निवृत्ती

    "निवृत्ती ".....नव्हे, आयुष्याची नवी आवृत्ती !

दिवस गेले, वर्षं गेली, अखेर आली निवृत्ती ,
आनंदामध्ये जगा आता, बदला आपली वृत्ती।

लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या,
 'बेड टी'ची लज्ज्त न्यारी, एकदा चाखून घ्या।

     चवीचवीने वाचा पेपर, वरवर फिरवून दृष्टी
 मापे काढा कॉंग्रेसची अन् मोदींची खरडपट्टी।

टीव्ही पहात चाखा नाश्ता, रोज़ नवीन डीश,
नित्य नव्या रेसिपींसाठी, सैल सोडा जीभ !

ऑफिसची ना घाई आता, रोजरोजची सुट्टी,
निवांत आंघोळ निवांत जीवन, करा मनाची पुष्टी ।

  सावकाशीने करा भोजन, मारा आडवा हात,
  पुरणपोळी,कधी बिर्याणी,कधी साखरभात ।

 वामकुक्षीला नका नाकारु,करा तिच्याशी गट्टी !

सायंकाळी,निवांत वेळी, आळस झटकून टाका,
पाणीपुरीच्या अन् मिसळीच्या दुर्लक्षू नका हांका !

चक्कर मारा बागेमध्ये, करा मोकळे पाय,
कट्यावरती रंगवा गप्पा, किंवा 'हॅलो' 'हाय' !

राहून गेलेला सिनेमा किंवा, नवे एखादे नाटक.....
 किंवा नुसते लोळता लोळता वाचा एखादे पुस्तक !
 
सुगृहिणी-आई-प्रेमळ आज्जी, नव्या नव्या भूमिका,
 इतरांसाठी कष्टलात आजवर, आता स्वत:साठीही जगा !

चित्र हे 'संध्या-संसाराचे', करा तुम्हीच रंगीन.....
निवृत्तीचे क्षण सुखाचे, खेळा " सेकंड इनिंग" !!

------सुजाता

चौथा कमरा ...

स्त्रीलाच काय, प्रत्येक व्यक्तीला  हवा एक "चौथा कमरा ".....
मग ती स्टडी रूम असो वा बागेतला कोपरा.....
शांत बसण्यासाठी, 'अभिव्यक्त' होण्यासाठी, स्वतःची "स्पेस " जपणारा......
नाहीतर माणूस स्वतःच्याच घरात होईल "उपरा".....!!

आयुष्य

 आनंदी रहाण्याची सुरवात कुठच्याही दिवसापासून करता येते,
फक्त तुम्हाला 'जाग' यावी लागते ......
आणि तुमच्यात ती 'आग' असावी लागते. ...
लोकांच्या तक्रारींचं आणि अपेक्षांचं ओझं
झुगारून देण्याची हिंमत असावी लागते !
एकदा का ते झुगारून दिलं, की आपण
पिसासारखे हलके होतो...
आणि स्वतःतच रमतो  !
मग आयुष्य खूप सुंदर होत जातं.....

Tuesday, June 7, 2016

️प्रेम म्हणजे काय असतं.....

प्रेम म्हणजे काय असतं,
म्हटलं तर काहीच नसतं,
मानलं तर सर्वस्व असतं !

         प्रेम म्हणजे कळवळून घातलेली साद,
            नकळत आलेला प्रतिसाद,
             आर्ततेने मारलेली हांक,
             मनापासून दिलेली दाद ।

प्रेम म्हणजे काळोखात धरलेला हात,
   शेवटपर्यंत दिलेला साथ,

   मुद्दाम दाखवलेला राग,
   आणि न सांगता केलेला त्याग !     
   प्रेम म्हणजे पांवसात चिंब भिजणं,        
   आणि एकांतात एकटीनेच रडणं ।

 प्रेम म्हणजे भर दुपारी कानावर आलेलं गाणं,
  आणि मग डोळे मिटून स्वप्नांमध्येच रमणं !

प्रेम म्हणजे क्षणिक रुसवा फुगवा,
आणि " माझे लाड पुरवा " !

         प्रेम म्हणजे नव्हेत 'एकाच्या'च अटी....
          आणि महागड्या भेटी !

प्रेम म्हणजे थरथरत्या हातांनी एकमेकांना सावरणं
परस्परांच्या आधारानी एकमेकांसाठी जगणं !

            प्रेम म्हणजे मानलं तर सर्वस्व असतं
             आणि हसलं तर काहीच नसतं !!

  --सुजाता.

प्यार.....

मैं आपका प्यार पाती, तो कोई जलता.....
मैं आपकी तस्वीर पाती, तो कोई छीनता....
पर मैंने आपकी यादें पायी हैं,
जो कोई छीन तो क्या,  देखभी नहीं सकता ।

Hello , पुलं .....

Hello...पुलं....
"भाई" म्हणण्याईतकी आपली जवळीक नाही.
तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची माझी इच्छा पूर्ण झाली नाही.
" नमस्कार करण्याजोगी माणसं कमी उरलीत " असं तुम्ही म्हणालात, तेव्हाच तुम्हाला वाकून नमस्कार करायला हवा होता.
पण ती ईच्छा आज  प्रभादेवीला चक्क   "पु. ल. देशपांडे कला अकादमी"च्या   समोर 'रहायला' आल्यावर पूर्ण झाली !
आता रोज खिडकीतून तुमच्या 'नावाचं' दर्शन घेते आणि तुम्हाला 'गुरूतुल्य ' असणाऱ्या  "रविन्द्र " नाट्यमंदिराच्या आवारात रोज फिरते,....तेव्हा
खूप छान वाटतं....!! तिथे होणारा  कार्यक्रम
चुकवत नाही.
आता, " स्वर्गात " तरी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन  भेटायचंय् ..!!

----सुजाता .

आठवणी .....

आठवणींचं  मोहोळ  ऊठलं,....
कित्येक  प्रसंग  डसले मनाला ....
पण शेवटी, गोड मधाचा  साठा मिळाला,
आयुष्यभराची  बेगमी  झाली....!

यादें .....

तुमसे  तो  अच्छी तुम्हारी   "यादें"  हैं....
जो  मेरे  बुलाते  ही  आतीं  हैं,....
और  मेरे  चाहनेतक  'रुकती'  हैं  ।
तुम्हारे तरह कभी छोड़कर नहीं जाती है ।

विश्वास

तू माझ्या पाठीशी आहेस सतत
हा माझा विश्वास  आहे...
तुझं नामस्मरण, हा माझा श्वास आहे.
तुझे अस्तित्व सदा माझ्या आसपास आहे,
हा भास नाही, जणू दरवळणारा सुवास आहे !

हर मुसीबत में तुम मेरे साथ हो,
ये मेरा विश्वास है ।
तुम्हारे नाम की माला जपना,
ये मेरा श्वास है  ।

मैत्रीचे सोनपंखी दिवस !

आम्ही सगळे  विलेपार्ल्याच्या  M.L.Dahanukar  कॉलेजचे  विद्यार्थी  ! 1984 मध्ये  B. Com. झाल्यावर  विखुरले गेलो होतो...जवळ  जवळ  30 - 31 वर्षं  आमच्यात काहीच communication  नव्हतं. पण, आमचा Admin अभय देव याने ठरवलं, की  आपला Whatsapp  ग्रुप तरी  स्थापन करायचा....राजू वाघ आणि  माधवी कुलकर्णी  यांनी सगळ्यांचे फोन नंबर्स  मिळवले, आणि आम्ही प्रथम  मे 2015 मध्ये भेटलो !
30 -31 वर्षांनंतर,  कॉलेजच्या  "मुलामुलींशी " बोलताना खूप बरं वाटलं...माझं नुकतंच  गुडघ्याचं operation  झालं असल्यामुळे  मी  फक्त 'Walker' आणि  'Internet' वर होते. अशावेळी, संसारात पूर्णपणे  बुडून  गेलेले असताना, कॉलेजचे 'सोनपंखी' दिवस  अनुभवायला मिळणे, ही  सुवर्णसंधीच होती !
6-7 महिने नुसतेच chatting आणि फोनवर बोलून आमची तहान भागली नाही, तेव्हा आम्ही  पिकनिकची  तयारी केली आणि चक्क
" जांभूळपाड़ा" आणि "लोणावळ्याला " जाऊनही आलो...आधी 10, मग 20  असं करत करत आता आम्ही 40 जणांचं Get-together ही केलं.
तरी एकूण 73 जणांचा ग्रूप आहे,....बाकीच्यांनाही आमच्या 'आनंदयात्रेत' सामील करायचं  आहे.
आम्ही पाठवलेले फोटो बघून एक  एक
'मुलगा-मुलगी'  (!)   सहभागी  होत गेले....
राजू वाघ-महेश वाडेकर सारखे गायक,
संजय कुशे - अभय मेहता सारखे आयोजक,  विजय ताळगावकर म्हणजे आमचा चालता बोलता  encyclopedia च !
माधवी आमची Treasurer  ! किरण पैंगणकर  आणि अजित साटम यांचा 'हजरजबाबीपणा' .... कुणाच्या कविता...  आणि 
वय विसरून  'थिरकायला' लावणारी गाणी... 
या  'गेट-टुगेदर' मुळे आम्हाला प्रत्येकाला आपल्यातलं Hidden Talent गवसलं....
मधली 30 वर्षे जणू काळाच्या ऊदरात  गुड़ूप  झाली... आमही चक्क  20-21 वर्षांचे तरूण झालो आणि  आम्ही पुन्हा "काॅलेजियन्स" बनलो.... जुन्या मित्र- मैत्रिणींशी नव्याने मैत्री जुळली,  तीही  घट्ट  !
आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना, आणि संसाराच्या,  करियरच्या " Peak " वर असताना, काॅलेजमधल्या मुलांसारखी धम्माल करतो आहोत. आताच्या आमच्या दिवसांचं वर्णन मी तीनच शब्दांत करेन __ Relaxing,
                       Refreshing, &
                       Rejuvenating  !!!
-- सुजाता मोघे,
शिवाजी पार्क, दादर.