सागरासरखं विशाल व्हावं माझं मन....
वेचेन मी त्यात, आनंदाचा कण न् कण.
ह्रुदयाच्या शिंपल्यात बनेल प्रत्येक क्षण,
मोत्याचे, जणू फुलेल नंदनवन ...!!
Tuesday, May 31, 2016
" माझं मन "
मुहब्बत
कोई कहे ' शायर ', ऐसी आस नहीं....
कोई समझे ' आशिक', मुझे परवाह नहीं...
दिलसे मुहब्बत की है, कोई गुनाह नहीं,
महसूस होता है, पर तुम मेरे आसपास नहीं ।
" नज्म "
अशांत मन में ऊठती लहरें....
यादोंके अनगिन मोती बिखरे
'समय'से कह दो इक पल ठहरें,
सूकून मिलेगा ' नज्मों' के सहारे ।
" पाऊस "
एखाद्या प्रियकरासारखी, वाट बघायला लाऊन पाऊस आला....
आणि प्रियकरासारखाच, लग्गेच गेला ....
पण, तन आणि मन प्रफुल्लित करून गेला,
रोज येण्याचा वादा करून गेला .....!!
--सुजाता
" रंग माझा वेगळा "
🌹जगी या सर्व नात्यांचा पसारा मांडला,
हेवा,मत्सर,ईर्षा यांचा खेळ सारा चालला....
रंगूनी रंगांत सा-या, रंग माझा वेगळा
आता जगू " आत्मानंदे" , श्वास घेऊ मोकळा.
छोट्या छोट्या आनंदाचा करू आता "सोहळा".
कारण,
आता मला भेटला, सखा माझा हरि सावळा !
सखा माझा हरि सावळा !!
" जमा "
🌹" जमा "
माझ्या मनात सतत चालू असते,
एक अदृश्य बेरीज - वजाबाकी !
कितीक जण येतात आयुष्यात ......
आनंद देऊन जातात, ....
काही जातात आणि आठवणी ठेऊन जातात .......!
सुखांचा होतो गुणाकार आणि दु:खांचा भागाकार !
काही आलं उत्तर तरीही, हाती जमा 'अनुभव' !
कायमच भरलेली माझी झोळी, .......
जसे, पूर्णांतून काढले घातले पूर्ण, तरी हाती उरावे पूर्णत्व !
'तो' दयाघन करतो " जमा" माझे न्यूनत्त्व !!
-- सुजाता.
" भगवान "
🌹भगवान
काहे ढुंढे भगवान को पुजा में , मंदिर में ...
भगवान तो बसे , मूरख ,
तेरी आत्मा में, हर घर में !
काहे बिताए समय सारा
जप - जाप्य में , कर्म कांड में ....?
देदो वक़्त थोडासा
मात - पिता को, सखी - पुत्र को ।
जिनका कोई नहीं है जगमें
गर उनको अपनाओ तुम,
खुदही खुदा बन जाओगे,
उनकी तो नजरोंमें तुम ।
कहत सुजाता, सुनो भाई यारों,
जितना बाँटो स्नेह सभीं को,
दुगना मिलता है प्यारों .......!!
--सुजाता
A Book called Life
Our Life is like a Book.कधीही एखादं पान उघडावं....it will give Smile on your face..& Sparkle in your eyes...! एखादं मोरपीस,...एखादं पिंपळाचं पान जाळीदार....
या पानावर मी माझ्या कविता Upload करत्येय, एकप्रकारे कवितांचा "Album च म्हणा ना....
