Saturday, September 6, 2025

आनंद

 कुणीतरी मला विचारलं,

 तुझ्या आनंदाचं रहस्य तरी काय ?..

आमच्यासारखीच दुःखं असताना,

 कटकटी असताना,

 तू एवढी मजेत कशी काय ?.....

मी हसले, म्हटलं त्यात काय.....?

 दुःखांना गोंजारायचं की काय,

कटकटींना तर हजार पाय.....

कंटाळा येण्याला तर सीमाच नाय.....!

पण खरं सांगू का, 

हा आनंद मला कुठे मिळाला नाही,

की दुसऱ्या कुणाचा,.... मी चोरलाही नाही.

हा आनंद.... माझा मी निर्माण केलाय !

दुःखाला मी खो दिलाय....

कंटाळ्याला मी लपवून ठेवलंय,

हास्याची लगोरी उभारलीए,

अन्  *"मज्जेची"*  चौकार ठोकलीए.....!

कुणाकुणाची नावे घेऊ,.....

आणि माझ्या आनंदाचे रहस्य सांगू....

आवडीची माणसं आजूबाजूला असतातच, नावडती मात्र हळूच गाळायची.....!

निळं निळं आकाश, रंगबिरंगी फुलं,

सुखवणारा वारा आणि गाणारे पक्षी....

आकाशात मस्त असते, ढगांची नक्षी !

आनंदाची काही गुरुकिल्ली नाही,

 कारण  तो मुळी बंदिस्तच नाही....!

✍️ सुजाता 💃💃💃💃

Thursday, June 5, 2025

Meditate !

 If u have any Questions about Life,....

Then Meditate !

Meditation Silences ur thoughts...

& Mind. 

In that Silence,  all the Questions 

 r Killed..... 

the Questions r Destroyed in sush a Subtle  way, 

that u won't even become Aware of it.

Slowly, u'll understand the Abserdity of ur  Questions......

Slowly, u'll become Aware  of the Utter Mystery of Life  !

Life is Not a Problem to be Solved !

There is No Answer to Any Questions about Life  ! 

It is a Mystery, Unanswerable...., Insoluble !!

U have to Live It,

U have to Taste It,

U have to  Experience  it  !!

& it is Best Experienced  in Silence !

Here, Meditation  helps, ..... 

bcoz,  

Meditation  Silences the Mind & Body.

Meditation is an Art.....

 of Getting Beyond the Mind ! 

When u go Beyond the Mind, Through Meditation,  

U r able to See……!

 The seeing  Happens. 

&  Seeing is  Transformation !!

When u r Transformed,  u Understanded  that U just  Exist !

U just Start Living in the Harmony of Existence  !!

Now, being Transformed, 

Knowing the Ultimate  Truth,  

Seeing  What is  Happening,  

U can't go Against the  Ultimate  Law of Life !

U were going against It, bcoz,  u were not aware of it !


When you are aware of it, you simply become a harmonious part of it.

 you fall into the organic Unity of Existence, .....

you disappear as an ego –

 the Dewdrop  Disappears into the Ocean .....

and Becomes the Ocean Itself !!


And that is fulfilment,.....

 and that is Contentment, ....

and that is the Ultimate Bliss, ... Nirvana  !!    

मोक्ष  !!


Osho - Walking in Zen Sitting in ZenQ

जर…..तर…..

 Fantasy.....

खरंच असं झालं तर.....

आपल्याला भूतकाळात जाता आलं तर,

आपण आत्ताचे, अन् ते साल मात्र जुनं,

त्या  दिवसांचं  मग आपण करू सोनं !

जे जे जमलं नव्हतं, बोललं नव्हतं, केलं नव्हतं....

ते  ते  तर करूच,  

पण, येणारा भविष्यकाळ ही बदलून टाकू !

नाही राहणार मग,  गतायुष्याची  खंत,

उरलेलं  आयुष्य  मग जगू  मनपसंत  !! 😃

✍सुजाता

Sunday, June 1, 2025

चक्र

 रणरणत्या ग्रीष्मा नंतर सुरूझाली पानगळ 

गळून पडले माझ्या लाडक्या झाडाचे

पान न् पान .....!

मिठी मारून म्हटले, मी माझ्या झाडाला,

नको दुःख करू, मी आहे ना तुला .....

झाड हळूच हसले, भास झाला मला, दुसऱ्या दिवशी येऊन बघते तर 

सुंदर नाजूक कोंब.... 

फुटली नाजूक पालवी झाडाला....!

झाडाने माझीच समजूत घातली,

काळजी करू नकोस, मुली....

गर्द काळोख्या रात्रीनंतर पहाट होते, पानगळीनंतर पालवी फुटते,....

हेच तर आयुष्याचे चक्र असते,

हेच तर आयुष्याचे चक्र असते....!!

✍️ सुजाता.

Wednesday, May 28, 2025

श्रिहरि

 तुकोबांना पावन केलेस, सदेही,.....

चोखोबांच्या घरी केलेस भोजन,

जनीचे कांडिले दळण,

राधेस पुरवी बांसुरीचे सूर....

मीरेच्या प्याल्यातील विष केले तू निष्प्रभ,

द्रौपदीची राखिली लाज, पुरवूनी वस्त्र,

अर्जुनाला उचलायला लाविलेस शस्त्र !

ज्याचा त्याचा कृष्ण, 

ज्याचा तो जाणितो भक्त....

सखा बनूनी माझा, तू होसी व्यक्त,

श्रीहरि, तूच रे, मज करिसी मुक्त....!!

✍️ सुजाता 🙏💕

परतीचा प्रवास

 आता परतीचा प्रवास सुरू झाला..... 

किती enjoyable आहे हा प्रवास....!

आता उंचावर चढायचं नाही, काही गाठायचं नाही.

वेळेत कुठे पोहोचायचं नाही.

कसलीही ईर्षा नाही, स्पर्धा नाही, आकांक्षाही नाही.

आता रमत गमत चालायचं..... परतायचं !

भोवतीचा निसर्ग नयाहाळायचा......!

मनात येईल तिथे रेंगाळायचं,

 पानाफुलांशी,  पक्षांशी कुजबूजायचं,

 नदीकिनारी आरामात बसायचं,

 पावसात भिजायचं.... सावलीत लोळायचं.

इतकी वर्ष हा निसर्ग उपभोगायलाच मिळाला नाही "ठहराव" कुठे मिळाला नाही.....

आता बरोबरीच्या प्रवास्यांची पण चिंता नाही,

कुणी मिळाले तर मिळोत, गळाले तर गळोत...

आपलं आपण एकटं, मजेत, शीळ घालत, गुणगुणत

 परतायचं ......! पण आता मात्र परतायचं !

"त्या"ची हाक ऐकू येऊ लागली आहे,

"त्या"चा हात  दिसू लागला आहे, 

"त्या"ला नाही विसरायचं.... आता परतायचं !

✍️ सुजाता

Sunday, May 18, 2025

“ ती “

 ती एक अळी होती, छोटीशी.... 

ओंगळवाणी,.....confused, 

नाराज स्वतःवरच....स्वतः च्या रूपावर....!

स्वतःवरचा राग इतका वाढत गेला,

की कोंडून घेतलं तिने, स्वतःला... कोशामध्ये... 

कुरूप असं सुरवंट बनून....!

कोशातल्या काळ्याकुट्ट अंधारात ती गुदमरून जाऊ लागली.......

 तिला वाटलं संपलं आता सारं.....

This is the End !

but that was not the End, 

that was a Bend......

ज्या क्षणी तिच्या हातात करण्यासारखं 

काही उरलं नाही, 

त्या क्षणी तो कोश फुटला आणि ती फुलपाखरू बनली.....

एक सुंदर,....रंगीत फुलपाखरू .....!

आता ती मुक्त होती......!

 विहरू लागली ती,  स्वच्छंदपणे......

                    आणि ही.....

 एक भग्न मूर्ती..... कुरूप, दगडी... काळी.

 नाराजच असायची तीही, स्वतःच्या रूपावर.

आजूबाजूच्या सुंदर सुंदर मूर्ती बघून 

आणखीनच खिन्न व्हायची....!

आणि एक दिवस तिच्यावर घाव पडू लागले....

असह्य वेदना देणारे,....

 छिन्नी चे घाव.....

 ती धावा करू लागली तिला निर्माण करणाऱ्याचा.....

 पूर्णपणे शरण गेली.....

 "सोडव मला यातून, किंवा पूर्णपणे  तोडून तरी टाक....."

पण शेवटचा असह्य करणारा घाव बसला, 

आणि तिच्या समोर आरसा आला.....

 आरशातले आपले रूप पाहून

 तिचा विश्वासच बसेना ....

" ही  मीच आहे.....?  इतकी सुंदर....?

 असामान्य..... अलौकिक.....!! ?"

आता ती एक देवी बनली होती,....

 देव्हाऱ्यात पूजली जाणारी.....!

✍️ सुजाता

हरि

 अश्या सुंदर संध्याकाळी.....

भिती न कळी काळाची, मुळी.

 डोळ्यांत माझ्या हरीची मूर्ती सावळी,

 तू सदा आहेस माझ्या जवळी....!

🙏💕 सुजाता

आनंदाचा झरा

 माझ्या आंत वाहतो आहे,

एक आनंदाचा झरा....

खळखळून वाहणारा, 

भरभरून ओसंडणारा,

श्रीहरिच्या बांसरीच्या सुरांवर डोलणारा,

सूर्यकिरणांवर, पक्षांच्या किलबिलाटावर

वाऱ्याची शिळ घालून नाचणारा....

कधी अवचित उदासला,

तरी खंडित न होणारा,

अन् उसळी मारून 

परत परत पुढे पुढेच जाणारा.....!!

✍️- सुजाता 🤗

Wednesday, May 7, 2025

रफ वही

 मला आठवते शाळेतली रफ वही.....

 बाइंडिंग केलेली जाडजूड .....

ना तिला सुंदरसं कव्हर, ना नवं लेबल,

अशी ती शाळेतली रफ वही.....!

या रफ वहीत काय नाही.....?

 इतिहास, भूगोल, गणित, कुठल्याच विषयाचं 

तिला बंधन नाही ...... 

कधी आवडतं गाणं, तर कधी एखादा 'शेर'....

 कुणाचा पत्ता, तर कुणाचा फोन नंबर .....

ऑफ पिरेड ला गोळा फुली,

 किंवा पाना- फुलांची नक्षी.....

लहानपणीच मोठं होऊन केलेली सही....

 मला आठवते ती शाळेतली रफ वही !

संसारात  "आई"  म्हणजे सुद्धा जणू रफ वही....!

साधी,  -- क्वचित 'गबाळी'....

मोकळी ढाकळी ...

कुणा कुणाचा रोल ती करत नाही .....?

स्वयंपाकीण रजेवर असेल तेव्हा स्वयंपाक- डबे, ड्रायव्हर नसेल तेव्हा शाळेत सोडते....

कित्येक महत्वाचे निरोप, फोन नंबर टिपून ठेवते.

सासर- माहेरच्यांशी  प्रेमाचे संबंध राखते,

प्रसंगी दटावते, रागावते, कणखर बनते,...

पण सगळ्यात  महत्त्वाची भूमिका तीच निभावते...!

 मला खूप खूप आवडते अशी ही रफ वही....!!

अशी ही, सही....माझी  "आई".....

मीही बनलीए एक सक्षम  "आई"....

आणि वाढवतेय माझ्या लेकीला, 

बनण्यासाठी एक आदर्श  "आई".....!!

✍️ सुजाता

Friday, May 2, 2025

I Did It My Way …..

 I have crossed many bridges,

walked each and every highway, 

but I am satisfied and proud to say 

that I did it my way .....!

I have cried many times,

but laughed many more,

Because I don't deny 

that I did it my way .....!

I may not have all i desired,

But surely, have all i deserved.

So, Gratitude, i strongly specify

As, I did it my way .....!

And now, soon the  end is here....

I shall get the Call from There....

but I'm Happy and Gay,

that I did it my way .....!

✍️ Sujata

Thursday, May 1, 2025

आत्ता आत्ता तर

 आत्ता आत्ताच तर हॉस्पिटलमधून घरी आलीस तू.

एवढंस्स गाठोडं होतं…..

सगळ्यांच्या लाडाकोडात न्हाऊन निघालीस….

कधी ऊपडी झालीस, टेकून बसायला लागलीस, 

क्षण न् क्षण आठवतोय मला. 

सरपटायचीस तू, 

रांगता येत नव्हतं….

एक दिवस अचानक

रांगायलाच लागलीस…,,

आणि धरून धरून उभी राहिलीस. 

तुझ्या सानिध्यात दिवस, महिने, वर्ष कसं भूर्कन ऊडून गेलं. 

आता तर मस्त चालतेस धावतेस,

आणि हळूहळू 

पाय-याही ऊतरू लागलीस की

बघता बघता मोठी होशील….

Butterflyच्या गाण्यावर हातवारे करणारी तू,

एक दिवस, स्वतःच्या विश्वात फूलपाखरासारखी ऊडून जाशील…..

मी मात्र प्रत्येक दिवस आठवत  राहीन. 

फूलपाखरू आपल्या हातावरून ऊडून गेलं, की कसा त्याचा स्पर्श जाणवत राहतो, 

तसा तुझा स्पर्श, बोलणं-

*”आज्जी”* म्हणणं, रेंगाळत राहील…..

गायीसारखं, मी, त्याच त्याच क्षणाचं ‘रवंथ’ करीत राहीन, गं !

पण जगाच्या पाठीवर कुठेही असशील तू,

तरी आपले ऋणानुबंध 

घट्ट च राहतील, हं ….!!

✍️ सुजाता आज्जी 😀

Wednesday, April 16, 2025

कहाणी लंडन रिटर्न आज्जीबाई ची !

 " चल रे भोपळ्या टुणुक टुणुक " 

लेकीकडे जाऊन जाडजूड होऊन परत आलेल्या म्हातारीची गोष्ट सगळ्यांनी लहानपणी ऐकलीच असेल. आत्ताच्या काळात सुद्धा अशीच एक म्हातारी ( जरी ती स्वतःला म्हातारी समजत नसली, तरी ) सातासमुद्रापार लंडनला लेकीकडे जाऊन, शरीराने धष्टपुष्ट आणि  मनाने  संतुष्ट होऊन आली,  तिची ही गोष्ट......

या म्हातारीला जेव्हा समजले की तिची, पार सातासमुद्रापलीकडली लेक छोटं बाळ आणणार आहे, तेव्हा ही सरळ उठली आणि लेकीला बाळंतपणासाठी मायदेशी घेऊन आली.  पंजाबी ड्रेस ला नसलेला पदर खोचून, तिने आयाबायांच्या मदतीने, लेकीचे बाळंतपण आणि नंतर नातीचे बारसे अगदी थाटामाटात केले !

सगळ्या आजी-आजोबांच्या आणि  मामा- मावशींच्या लाडाकोडात नात वाढू लागली. पण आता लेकीची कर्मभूमीकडे जाण्याची वेळ झाली.  त्याबरोबर परत ही म्हातारी, जीन्स ला नसलेला पदर खोचून, नाती बरोबर लेकीच्या घरी निघाली. 

एअरपोर्टवरच्या कस्टम ऑफिसरच्या रूपातील वाघोबा आणि लांडग्यांनी म्हातारीला अडवले, पण ही काही घाबरली बिबरली नाही. तिने वाघोबांना ठणकावून सांगितले की ती फक्त नातीला तूप रोटी  खिलवायला आली आहे !

         परदेश तसा म्हातारीला नवखा नव्हता, पण यावेळी ती आजीच्या भूमिकेतून  सर्व पहात होती.

 मायदेशात गणपतीचा सण तिचा हुकला खरा, पण परदेशातल्या महाराष्ट्र मंडळात, खणखणीत आवाजात गणपतीला मंत्रपुष्पांजली वाहून तिने हौस भागवून घेतली !

नातीचा पहिला वाढदिवस सुद्धा तिने मोठ्या जोमात साजरा केला. नंतर दिवाळीला, मायदेशातून आलेल्या कंदील- फराळ आणि पणत्या, यांनी दिवाळी सण सुद्धा झगमगून टाकला ! 

आजी नातीला तूप रोटी खिलवत होती, पण लेक आणि जावई तिला पिझ्झा- पास्ता- Croissant , लझानिया, आणि काय काय खिलवून जाडजूड करत होते.  पण तिची नात मात्र तिला  " On her toes "  ठेवत होती !

म्हातारीला भेटण्यासाठी खास, तिचा भाऊ आणि वहिनी फार लांबून कॅनडाहून आले आणि म्हातारीने त्यांच्याबरोबर 'जीवाचे लंडन' केले !

हे कमी म्हणून की काय लेकीने तिला स्कॉटलंडला फिरवून आणले. आजी नातीबरोबर शब्दशः  Chill करीत होती !                       एवढ्या सगळ्या घडामोडींचे वर्ष बघता बघता संपले. आजीने लेकी बरोबर सरत्या वर्षाला बाय बाय केले आणि नाती बरोबर नवीन वर्षात आणि नवीन 'विश्वात' पदार्पण केले !

आता मात्र म्हातारीला माय देशाची ओढ लागली. तिथे तिची माणसं, तिच्या मैत्रिणी आणि तिचे कार्यक्रम तिला साद घालू लागले. तिने आपली बॅग भरायला घेतली.

 जड मनाने आणि जड बॅगेने, आजी परतीच्या प्रवासाला निघाली. यावेळी मात्र भोपळ्यातून न जाता तिने भोपळ्या एवढ्याच मोठ्या जंबो जेट ने जायचे ठरवले. 

परतताना नेहमीप्रमाणेच कस्टम्स  वरच्या वाघ -सिंह आणि लांडग्यांनी तिला अडवले. पण पुन्हा म्हातारी अजिबात घाबरली नाही ! आपला दोन वर्षांचा लंडनचा  Visa  दाखवून 

"मी पुन्हा येईन ......!"

 असे तिने त्यांना ठणकावून सांगितले.

विमानात म्हातारीच्या हातातल्या मोबाईल मध्ये भूतकाळातल्या आठवणी -फोटो - होते आणि डोळ्यांमध्ये भविष्याची स्वप्ने......! 

एवढ्यात विमानातल्या हवाई सुंदरीने म्हातारीला 'वर्तमानात' आणले.

"What would you like to have Ma'am, tea or coffee ?"

असे तिने विचारताच म्हातारी सराईतपणे उत्तरली.....

"One hot  Caffe' Latte,  Please "

- ✍️ सुजाता 

Experience with Anubhav Vacations

 पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काश्मिर….

 सहलीचा स्वर्गीय “अनुभव “

घेण्यासाठी आलो “अनुभव Travels” बरोबर. 

Anubhav  Travels म्हणजे 

“हट के destinations” !

रोजच्या धावपळीच्या जीवनापासून पूर्णपणे Relaxation !

हसतमुख, आनंदी, मनमोकळे सहप्रवासी….

माधवी, मनाली, राधा, भाग्यश्री, डॉक्टर विद्या, वसुधा, आणि वंदना….

आणि त्यांचे जीवनसाथी, 

शिवाय राजू, अक्षय, आणि सगळे चालक, गाईड, यांनी प्रवास बनवला बहारदार !

अक्षय म्रृदुभाषी, तर राजू उत्साही,….

दोघेही आतिथ्यशील, हसतमुख 

Caring, मदतीस तत्पर, 

फोटो काढायला तैय्यार,

प्रत्येकाला हवंनको विचारणार,

आग्रहाने गरमागरम खाऊ घालणार,

त्या दोघांमुळे प्रवास झाला सुखकर, 

Mehtta Home stay  असो, वा Hotel Paradise 

किंवा Milky Way…. प्रत्येक मुक्काम झाला आरामदियी, खरोखर….!

भरपूर खाणंपिणं, 

गप्पा- गाणी गाणं,  

मनसोक्त shopping,

धबधब्यांचा खळखळाट-

ट्युलिप्स च्या रंगाची ऊधळण, 

गालिच्यासारखी, फुलांची पखरण

निसर्गरम्य फोटोंची साठवण….

७ दिवस कसे उडाले भुर्रकन -

जगले पुन्हा एकदा शाळा कॉलेज मधले Tenssion free जीवन….!

खरंच, देवाचे किती आभार मानायचे—

आयुष्यातला प्रत्येक क्षण 

“महोत्सव“ बनवल्याचे, 

आयुष्यातला प्रत्येक क्षण 

“महोत्सव“ बनवल्याचे !!

✍️ सुजाता मोघे 

शिवाजी पार्क, दादर.