माझ्या मनात आहे एक लहान मूल दड़लेलं....
जगापासून, नीती नियमांच्या चौकटीपासून लपवलेलं
समाजात असले की मी शिस्तीत बसते....
एकटीच असले की मात्र मी त्याला बोलावते,
माझ्याशी दंगा- मस्ती करायला....
गाण्यांवर नाचायला, पावसात भिजायला....
ते मूलच माझा सखा हरि बनतं
मग मी 'आशा' बनून गाणी गाते,
अन् 'ओशो' बनून मेड़िटेशनही करते....
शेवटी, मेड़िटेशन म्हणजे तरी काय,
"आंतर आत्म्याशी संवाद साधणे"च ना ?....
मग मी ही स्वतःला सादच तर घालते, ना ?....
असंच मूल असतं आपल्या सगळ्यांच्यात लपलेलं..
पण सगळे त्याला दड़वतात....पार मारून टाकतात
मग शैशव हरपतं, अन् उरतं केवळ "पोक्तपण" !!
--✍ सुजाता.