Wednesday, August 3, 2022

space

प्रत्येक नात्यामध्ये हवा एक  अवकाश....Space,
जवळच्या,  अन्  दूरच्याही....!
हा अवकाश, घेऊ देतो, नात्यांना, 
 मोकळा  श्वास..!
जवळचं नातं मग  टोचत नाही, 
अन् दूरचं, बोचत नाही.
कधी हा अवकाश, 
स्वप्नांनी भरून काढायचा, 
तर कधी  संवादांनी ....
पण खचितच हवा, नात्यांमध्ये, 
एक आश्वासक  अवकाश.....!!
-✍सुजाता

No comments: