मला आठवते शाळेतली रफ वही.....
बाइंडिंग केलेली जाडजूड .....
ना तिला सुंदरसं कव्हर, ना नवं लेबल,
अशी ती शाळेतली रफ वही.....!
या रफ वहीत काय नाही.....?
इतिहास, भूगोल, गणित, कुठल्याच विषयाचं
तिला बंधन नाही ......
कधी आवडतं गाणं, तर कधी एखादा 'शेर'....
कुणाचा पत्ता, तर कुणाचा फोन नंबर .....
ऑफ पिरेड ला गोळा फुली,
किंवा पाना- फुलांची नक्षी.....
लहानपणीच मोठं होऊन केलेली सही....
मला आठवते ती शाळेतली रफ वही !
संसारात "आई" म्हणजे सुद्धा जणू रफ वही....!
साधी, -- क्वचित 'गबाळी'....
मोकळी ढाकळी ...
कुणा कुणाचा रोल ती करत नाही .....?
स्वयंपाकीण रजेवर असेल तेव्हा स्वयंपाक- डबे, ड्रायव्हर नसेल तेव्हा शाळेत सोडते....
कित्येक महत्वाचे निरोप, फोन नंबर टिपून ठेवते.
सासर- माहेरच्यांशी प्रेमाचे संबंध राखते,
प्रसंगी दटावते, रागावते, कणखर बनते,...
पण सगळ्यात महत्त्वाची भूमिका तीच निभावते...!
मला खूप खूप आवडते अशी ही रफ वही....!!
अशी ही, सही....माझी "आई".....
मीही बनलीए एक सक्षम "आई"....
आणि वाढवतेय माझ्या लेकीला,
बनण्यासाठी एक आदर्श "आई".....!!
✍️ सुजाता