Wednesday, May 28, 2025

परतीचा प्रवास

 आता परतीचा प्रवास सुरू झाला..... 

किती enjoyable आहे हा प्रवास....!

आता उंचावर चढायचं नाही, काही गाठायचं नाही.

वेळेत कुठे पोहोचायचं नाही.

कसलीही ईर्षा नाही, स्पर्धा नाही, आकांक्षाही नाही.

आता रमत गमत चालायचं..... परतायचं !

भोवतीचा निसर्ग नयाहाळायचा......!

मनात येईल तिथे रेंगाळायचं,

 पानाफुलांशी,  पक्षांशी कुजबूजायचं,

 नदीकिनारी आरामात बसायचं,

 पावसात भिजायचं.... सावलीत लोळायचं.

इतकी वर्ष हा निसर्ग उपभोगायलाच मिळाला नाही "ठहराव" कुठे मिळाला नाही.....

आता बरोबरीच्या प्रवास्यांची पण चिंता नाही,

कुणी मिळाले तर मिळोत, गळाले तर गळोत...

आपलं आपण एकटं, मजेत, शीळ घालत, गुणगुणत

 परतायचं ......! पण आता मात्र परतायचं !

"त्या"ची हाक ऐकू येऊ लागली आहे,

"त्या"चा हात  दिसू लागला आहे, 

"त्या"ला नाही विसरायचं.... आता परतायचं !

✍️ सुजाता

No comments: