हे बरे झाले, देवा, दिला अंधार तू इतका मला....
एक ठिणगी आंत माझ्या, लागली उजळायला !
या प्रवासाची दिशा, आता नको बदलायला,
जन्म जावा लागतो ही सार्थता समजायला.
नाकारले जाण्यातला दर्द ज्याने जाणला,
रिते होण्यातला आनंदही त्यानेच हो, ओळखला !
प्रेमातही अन् द्वेशातही, माझा जीव होता अडकला,
मीच केले मोकळे, त्यांना ही, आणि स्वतः ला !
✍ सुजाता