Saturday, January 22, 2022

जाग

आनंदी रहाण्याची सुरवात कुठच्याही दिवसापासून करता येते, 
फक्त तुम्हाला 'जाग' यावी लागते ......
आणि तुमच्यात ती 'आग' असावी लागते. ...
लोकांच्या तक्रारींचं आणि अपेक्षांचं ओझं 
झुगारून देण्याची हिंमत असावी लागते !
एकदा का ते झुगारून दिलं, की आपण 
पिसासारखे हलके होतो...
आणि स्वतःतच रमतो  !
मग आयुष्य खूप सुंदर होत जातं.....
✍️सुजाता.

Tuesday, January 18, 2022

ओंजळ

शिशिरातील पानगळीसम, गळून गेली नाती....
जगरहाटी ही स्वीकारली मी,ओंजळ करूनी रिती.
सुखदुःखाची ना आसक्ती, नुरली कसली भिती...
ह्रदयी केवळ उरली आता हरिनामाची प्रीती...!!
✍ सुजाता.

Friday, January 14, 2022

पतंग

एक डौलदार पतंग उंच गगनात ऊडाला,
 वाऱ्याच्या लहरी संगे बहरला ......
दिमाखात उंच भरारी घेऊ लागला
 पण, उंचच उंच भरारी ने तो झाला उन्मत्त,
आपल्या उंचीचाच त्याला झाला गर्व,
मांजा त्याला म्हणाला माज करू नकोस....
मी आहे जमिनीवर, फिरकीला धरून घट्ट,
म्हणून तू भराऱ्या घेतोयस,.... पटतं ?
वारा म्हणाला दोघेही फुशारक्या मारू नका,
मी आहे म्हणून उडताय, मी पडलो तर पडाल !
पण पतंगाने मानलं नाही, आपल्याच मस्तीत उडला
एका क्षणी उन्मत्त होऊन मांज्याला लाथाडला....
ज्या क्षणी मांज्याची साथ सोडली, 
त्याक्षणी पतंग भिरभिरला.... 
वाऱ्यानेही पाठ फिरवली अन् पतंग जमिनीवर कोसळला...
मांजाचेही कार्य संपले, वारा जरी होता बहरत....
आपल्या माणसांची साथ सोडू नका,
हेच जणू होता समजावत.....!
✍️ सुजाता

Monday, January 10, 2022

ईश्वर

आयुष्याच्या शेताचे रक्षण 
करी उत्तम "सदाचरणा" चे कुंपण ;
द्वेष मत्सर हेवा काढून टाकून
शुद्ध करावे अंतःकरण,
जशी उत्तम काळी भुसभुशीत जमीन !
सकस 'बी' म्हणजे भगवंताचे नामस्मरण
सत्संगती आणि ध्यानधारणा
यांचे करावे सिंचन....!
चित्ताची शुद्धी निर्माण करील आकर्षण 
होईल भगवंताची कृपादृष्टी, 
करुण दयाघन ईश्वर करील प्रेमाची वृष्टी !
✍️ सुजाता

Monday, January 3, 2022

Transformation

I have been going through many Breakdowns,....
I think, im getting through them.....
I'm no longer in the stage of a Caterpillar, not yet become a Butterfly....!
I don't know who I am, and
I don't know where I'm going.
I only know that Every bit of me is calling for Transformation ! 
For the Resolution of my Spirit ! ...... for Elevation !
on this Stage, I'm Surrendering.... Totally....to the Supreme Power.....!
I'm just Being....in Harmony with the Universe ! 
Letting Life Happen to me.....
I'm discovering myself.....
I'm unfolding my True Self.....!
This not the Death of me, 
this is the dying of who I was Once !
This is actually my Re-Birth !!

Saturday, January 1, 2022

Recharge

मोबाईल सारखं एका क्लिक मध्ये
स्वभाव Cool Down करता येईल का ?
मनातले सगळे किल्मिष
Delete करणं जमेल का ?
जुनं सगळं विसरून जाऊन
आयुष्य Refresh करू शकू का ?
मेङिटेशन नी निदान Recharge तरी
नक्कीच करता येईल.....!!
✍सुजाता