वाऱ्याच्या लहरी संगे बहरला ......
दिमाखात उंच भरारी घेऊ लागला
पण, उंचच उंच भरारी ने तो झाला उन्मत्त,
आपल्या उंचीचाच त्याला झाला गर्व,
मांजा त्याला म्हणाला माज करू नकोस....
मी आहे जमिनीवर, फिरकीला धरून घट्ट,
म्हणून तू भराऱ्या घेतोयस,.... पटतं ?
वारा म्हणाला दोघेही फुशारक्या मारू नका,
मी आहे म्हणून उडताय, मी पडलो तर पडाल !
पण पतंगाने मानलं नाही, आपल्याच मस्तीत उडला
एका क्षणी उन्मत्त होऊन मांज्याला लाथाडला....
ज्या क्षणी मांज्याची साथ सोडली,
त्याक्षणी पतंग भिरभिरला....
वाऱ्यानेही पाठ फिरवली अन् पतंग जमिनीवर कोसळला...
मांजाचेही कार्य संपले, वारा जरी होता बहरत....
आपल्या माणसांची साथ सोडू नका,
हेच जणू होता समजावत.....!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment