Thursday, December 30, 2021

नवं वर्ष

नवं वर्ष, नवा हर्ष....
करील सौभाग्याची वृष्टी 
समंजसपणाचा अन् सौदार्ह्याचा साज ल्यायली सारी सृष्टी 
जुनीच माणसं, नवी नाती, कारण आता बदलली माझी दृष्टी.....
नवं वर्ष, नवा हर्ष...
हृदयात भरून घे नवी उमेद,
मिटवून सारे भेदाभेद ।
तरच हे वर्ष नवं, 
वाटेल नेहमी हवं हवं !
✍सुजाता

अश्रू

साध्या साध्या गोष्टींत डोळ्यांत पाणी यायला,
अश्रू एवढे स्वस्त आहेत का ग ?
छोट्या छोट्या गोष्टींत आनंद घे,
आयुष्य इतकं मस्तआहे ग.....!!
✍सुजाता.

Wednesday, December 29, 2021

रंग माझा

रंगूनी रंगांत साऱ्या, 
रंग माझा वेगळा....
गुंतूनी गुंत्यात साऱ्या, 
पाय माझा मोकळा
काडी काडी जमवूनी मी,
जीव ओतिला सगळा,
त्या घराच्या चौकटितूनी
आता मजला वगळा....!
बीज लाविले, "स्वत्त्वाचे"
त्याला कोंब आला कोवळा,
मुक्त जगाच्या अंगणी मज
श्वास घेऊदे, मोकळा....!
वाट पहतो कधीची, 
हरि माझा सावळा,
अवघे जीवन बनले जणू 
आनंदमयी सोहळा....!!
-✍️  हरिसखी सुजाता

Saturday, December 25, 2021

"क्ष"

शाळेत गणित सोडवताना गृहित धरायचो, "क्ष"
सोडवताना प्रत्येक पायरीवर त्याच्याकडेच असे लक्ष
 "क्ष"ची किंमत समजायची, आणि गणितही सुटायचे.
आता आयुष्यातही, प्रत्येक संकटात
परमेश्वरालाच धरावे हाताशी .......
प्रॉब्लेम सुटेल चुटकीसरशी.....
"त्याची" किंमत कळेल आणि आपली होईल सरशी !
✍️ सुजाता