skip to main
|
skip to sidebar
sujatamoghe
Wednesday, June 29, 2022
खुद
जिंदगी का रास्ता बहुत लंबा है,....
अभी कोसों चलना बाक़ी है ।
कईं तूफ़ान आए,....कईं बादल छाए,
हर फिक्र को धुंए में उडाना बाक़ी हैं ।
कुछ सुख-दुःख मिलें, कुछ साथी बिछङे,
अब तो बस, 'खुद' से मिलना बाक़ी है ।
✍ सुजाता
attachment
किती अट्टाहास माझा, लेकाने मला सर्व सांगावे,
लेकीच्या आयुष्यात मला महत्वाचे स्थान असावे,
आणि नव-याने मला नेहमीच समजून घ्यावे,....
"अपेक्षांचे" रूपांतर "आग्रहात" कधी झाले ?....
तर मग, माझ्या दुःखाचे मीच "कारण" ठरले....!
"अनुभव गुरू"ने आता मला समजावले,
"Attachments" सोडल्यावर सर्व सुरळीत झाले.
😊✍ सुजाता
माया
किती लाविले मी तुला बोल, देवा,....
कितीदा दुःखात केला मी त्रागा.
हसले, रङले,.....उगा शिणविली काया....
उमगले ना मजला, ही तुझी सर्व "माया" !
कळतो, मला आता , हा तुझा सारा खेळ...
दवङला फुकाचा, आयुष्यात वेळ....!
समजाविले मी स्वतःलाच आता,
मी केवळ निमित्त, तूच कर्ता, करविता !!
✍ सुजाता.
Tuesday, June 21, 2022
पाऊस
आवडतं मला, मनसोक्त पावसांत भिजायला....
देहावरची वयाची जळमटं पाण्यात धूवायला,
डोळ्यांतील आसवं, पाण्यात मिसळून टाकायला.
आपलाच गंध घेऊन हवा सुगंधी होते,
आणि मनातली मदिरा घेऊन, पाऊस नशीला होतो,
तोही मग आपल्याबरोबर गातो, अन् नाचतोही...!
✍सुजाता
Sunday, June 19, 2022
स्वप्न
हे स्वप्न म्हणू, सत्य की आभास....
तुझं अस्तित्व सतत माझ्या आसपास....
फुलातून अलग करता येईल का कधी सुवास....
तृप्त आहे मी, आता कसलीच उरली नाही आंस !
( हे प्रियकरालाही लागू पडतं.....
अन् परमेश्वरालाही.....)
✍सुजाता
Tuesday, June 14, 2022
पाऊस
कधी मला वाटतं, पाऊस व्हावं....
धुंदपणे तुझ्यावर बरसावं,
अन् गंध होऊन श्वासात मिसळावं !
तर कधी वाटतं, थंड़ी बनून तुला लिपटावं,
तुझ्या गालांवर गुलाबी आणावी....
कधी तर वाटतं, सौम्यसं ऊन व्हावं....
छान 'सनी ड़े' करून तुला खूष करावं !
नेहमीच वाटतं मला, वारा बनून
तुझ्या अवतीभवती वावरावं,
किंवा चक्क आभाळ बनावं,
आणि सतत तुझ्यावर मांड़व घालावा !!
✍सुजाता
Thursday, June 2, 2022
भक्त
पूर्णपणे समर्पित होणारा
भक्त व्हायचंय मला,
नाजूक फुलांचा सडा टाकून मोकळा होणारा प्राजक्त व्हायचंय मला....
मनातल्या भावना सहजपणे बोलून
व्यक्त व्हायचंय मला,
अन्
उगीचच अडकवणाऱ्या बंधनातून
मुक्त व्हायचंय मला.....!!
✍️ सुजाता
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)
Followers
Blog Archive
►
2025
(14)
►
September
(1)
►
June
(3)
►
May
(8)
►
April
(2)
►
2024
(3)
►
November
(1)
►
April
(1)
►
January
(1)
►
2023
(13)
►
December
(2)
►
November
(3)
►
October
(1)
►
August
(5)
►
April
(2)
▼
2022
(72)
►
December
(3)
►
October
(4)
►
September
(8)
►
August
(16)
►
July
(17)
▼
June
(7)
खुद
attachment
माया
पाऊस
स्वप्न
पाऊस
भक्त
►
May
(1)
►
April
(3)
►
March
(3)
►
February
(4)
►
January
(6)
►
2021
(41)
►
December
(4)
►
November
(5)
►
October
(6)
►
August
(3)
►
July
(2)
►
June
(2)
►
May
(2)
►
April
(4)
►
March
(5)
►
February
(5)
►
January
(3)
►
2020
(66)
►
December
(6)
►
November
(12)
►
October
(8)
►
September
(25)
►
August
(15)
►
2018
(2)
►
March
(2)
►
2017
(8)
►
June
(2)
►
February
(5)
►
January
(1)
►
2016
(60)
►
December
(2)
►
August
(1)
►
July
(3)
►
June
(46)
►
May
(8)
►
2008
(1)
►
November
(1)
About Me
$ujata
View my complete profile