Monday, October 24, 2022

मेरी life

अब मैंने पूछना छोङ दिया है,
की मुझें जिंदगीसे क्या चाहिए....
अब मैं पूछतीं हूँ,
कि जिंदगी को मुझसे क्या चाहिए ।
बहुत जी लिए, गुस्सा और तक़रार करते हुए,
अपने गमों का इलज़ाम औरोंको थोपते हुए ।
अब मैंने चखा है, ज़िम्मेदारी उठानेका 'स्वाद'
मेरे सुख- दुख की जिम्मेवार हूँ मै ।
ख़ुद मैं ही मेरी जिंदगी की शिल्पकार हूँ मैं ।
दूसरों को और खुद को भी 
माफ़ करने को तैयार हूँ मैं ।
अबसे तो खुद की ही यार हूँ मै ।
क्यों ढूँढू मैं और कहीं, 
बस अब तो खुद ही मेरा प्यार हूँ मैं ।
✍ सुजाता ।💃🏼

Saturday, October 22, 2022

कृष्णसखा

एकेकाचा कृष्णसखा, प्रत्येकाला भेटतो ....
खोल खोल आत मनाच्या, तोच राहात असतो.
 बुद्धी तेथे थांबते, अन विचारही संपतो,
 ज्याचा त्याचा कृष्णसखा ज्याला त्याला लाभतो !
मी न  शरीर माझे, अहंकारही हा संपतो....
 ज्याचा त्याचा कृष्ण सारथी, योग्यवेळी भेटतो !
मी कधीच बद्ध नव्हतो, हे उमगते त्या क्षणी, 
प्रत्येकाचा कृष्णसखा अंतर्यामी गवसतो....!!
✍️ सुजाता.

Friday, October 21, 2022

आयुष्याचे चक्र

एक  सुगंध मालवलेलं, 
निस्तेज फुल 🥀
झाडावरून गळून पडलं.....
हळुवार मातीवर पहुडलं. 
त्याला का त्याचं दुःख झालं....?
की पडल्यामुळे लागलं ?
नाही !
म्लान पाकळ्यांवर त्याच्या,
मंद स्मित झळकलं. 
झाडाशी, इतर फुलांशी, अन्
फुलपाखरांशी नातं संपलं, 
म्हणून क्षणभर वाईट वाटलं.....
पण फुलताना त्याने सुगंध पसरवला,
फुलपाखरांना मधाचे दान दिले,
पराग कणही वाऱ्यावर सोडले.....
त्याच्या आयुष्याचे 'पूजेचे निर्माल्य' झाले,
अवघ्या देहाचे सोने झाले....!🥀
आता, गळल्यावरही ते कदाचित 
देवाच्या चरणीं ऋजू होईल,.....
एखाद्या फुलदाणीत विराजमान होईल,
किंवा कुणा रमणीचा केशसंभार सजवेल.
आणि अखेर मातीशी एकरूप होईल...
तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईल,.....
नवीन रोप अंकुरेल, 
अन् नवीन फूल फुलेल. 
फुलण्याचं,आयुष्याचं चक्र असंच चालू राहील.....
आयुष्याचं चक्र  अखंड चालूच राहील.....!
🥀🥀🥀

Tuesday, October 11, 2022

पिकलं पान

अरे पिकल्या पाना,....
गळून पडणार म्हणून
का उगां खंतावतोस मनां ?
कधीकाळी नाजूक कोंब बनून,
तू वटवृक्षाची सुरूवात केलीस,
हिरवं गार पान बनून वाटसरूला
तुझयापरीने सावली दिलीस.
बहरानंतर पानगळ येणार,
हा ऋतुचक्राचा नियम असतो,
परिपक्वपणे गळून जायला,
मग तू का एवढा विरोध करतो ?
कदाचित गाणाऱ्या वाऱ्यासंगे
तू तरंगत जाशील....
कदाचित पाण्यावर पडून एखाद्या
मुंगीचा जीव वाचवशील....
रंगीत फुलांबरोबर कदाचित
गुच्छामध्ये गुंफला जाशील.
किंवा 'पत्री' बनून देवाच्या
चरणांवर वाहिला जाशील....
एखादा रसिक, वहीत ठेवून
तुला जाळीदार बनवेल,.....
कशावरून, गळून पडल्यावर
आयुष्य तुझं उजाड बनेल ?
झाडाचा Comfort Zone सोडण्यातच
आहे तुझं भलं, खरं !
आणि हे तुला, लवकरात लवकर
उमगलं, तर बरं !!
✍️ सुजाता 🍂