आत्ता आत्ताच तर हॉस्पिटलमधून घरी आलीस तू.
एवढंस्स गाठोडं होतं…..
सगळ्यांच्या लाडाकोडात न्हाऊन निघालीस….
कधी ऊपडी झालीस, टेकून बसायला लागलीस,
क्षण न् क्षण आठवतोय मला.
सरपटायचीस तू,
रांगता येत नव्हतं….
एक दिवस अचानक
रांगायलाच लागलीस…,,
आणि धरून धरून उभी राहिलीस.
तुझ्या सानिध्यात दिवस, महिने, वर्ष कसं भूर्कन ऊडून गेलं.
आता तर मस्त चालतेस धावतेस,
आणि हळूहळू
पाय-याही ऊतरू लागलीस की
बघता बघता मोठी होशील….
Butterflyच्या गाण्यावर हातवारे करणारी तू,
एक दिवस, स्वतःच्या विश्वात फूलपाखरासारखी ऊडून जाशील…..
मी मात्र प्रत्येक दिवस आठवत राहीन.
फूलपाखरू आपल्या हातावरून ऊडून गेलं, की कसा त्याचा स्पर्श जाणवत राहतो,
तसा तुझा स्पर्श, बोलणं-
*”आज्जी”* म्हणणं, रेंगाळत राहील…..
गायीसारखं, मी, त्याच त्याच क्षणाचं ‘रवंथ’ करीत राहीन, गं !
पण जगाच्या पाठीवर कुठेही असशील तू,
तरी आपले ऋणानुबंध
घट्ट च राहतील, हं ….!!
✍️ सुजाता आज्जी 😀

No comments:
Post a Comment