ती एक अळी होती, छोटीशी....
ओंगळवाणी,.....confused,
नाराज स्वतःवरच....स्वतः च्या रूपावर....!
स्वतःवरचा राग इतका वाढत गेला,
की कोंडून घेतलं तिने, स्वतःला... कोशामध्ये...
कुरूप असं सुरवंट बनून....!
कोशातल्या काळ्याकुट्ट अंधारात ती गुदमरून जाऊ लागली.......
तिला वाटलं संपलं आता सारं.....
This is the End !
but that was not the End,
that was a Bend......
ज्या क्षणी तिच्या हातात करण्यासारखं
काही उरलं नाही,
त्या क्षणी तो कोश फुटला आणि ती फुलपाखरू बनली.....
एक सुंदर,....रंगीत फुलपाखरू .....!
आता ती मुक्त होती......!
विहरू लागली ती, स्वच्छंदपणे......
आणि ही.....
एक भग्न मूर्ती..... कुरूप, दगडी... काळी.
नाराजच असायची तीही, स्वतःच्या रूपावर.
आजूबाजूच्या सुंदर सुंदर मूर्ती बघून
आणखीनच खिन्न व्हायची....!
आणि एक दिवस तिच्यावर घाव पडू लागले....
असह्य वेदना देणारे,....
छिन्नी चे घाव.....
ती धावा करू लागली तिला निर्माण करणाऱ्याचा.....
पूर्णपणे शरण गेली.....
"सोडव मला यातून, किंवा पूर्णपणे तोडून तरी टाक....."
पण शेवटचा असह्य करणारा घाव बसला,
आणि तिच्या समोर आरसा आला.....
आरशातले आपले रूप पाहून
तिचा विश्वासच बसेना ....
" ही मीच आहे.....? इतकी सुंदर....?
असामान्य..... अलौकिक.....!! ?"
आता ती एक देवी बनली होती,....
देव्हाऱ्यात पूजली जाणारी.....!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment