Tuesday, May 31, 2016

" जमा "

🌹" जमा "

माझ्या मनात सतत चालू असते,

एक अदृश्य बेरीज - वजाबाकी !

कितीक जण येतात आयुष्यात ......

आनंद देऊन जातात, ....

काही जातात आणि आठवणी ठेऊन जातात .......!

सुखांचा होतो गुणाकार आणि दु:खांचा भागाकार !

काही आलं उत्तर तरीही, हाती जमा 'अनुभव' !

कायमच भरलेली माझी झोळी, .......

जसे, पूर्णांतून काढले घातले पूर्ण, तरी हाती उरावे पूर्णत्व !

'तो' दयाघन करतो " जमा" माझे न्यूनत्त्व !!

-- सुजाता.

No comments: