Thursday, June 23, 2016

माणसं .....

हल्ली पुस्तकं वाचणं  सोडूनच दिलंय  मी...
हल्ली  माणसंच  वाचत असते मी ...
काही काही, पुन्हा  पुन्हा वाचाविशी वाटतात,
समजून घ्यावीशी ......
काही नव्याने  कळतात.
काही अगम्य,  दुर्बोध,
अर्धवटच सोडून द्यावीशी....
पण किती  प्रकार.... किती  तऱ्हा...
काही सोपी, लघुकथेसारखी,
तर काही किचकट,  नवकथेसारखी.
काही  बोअरिंग... कादंबरीसारखी.
तर काही इंटरेस्टिंग,  रहस्यकथेसारखी .
पण तरीही ,  हरएक,  वेगवेगळी....!
काही पुस्तकं, - अहं - माणसं,
दुःखी  करतात,  तर काही,  अंतर्मुख....!
आता , मला  'स्वतःलाच'  वाचलं  पाहिजे एकदा,
चष्मा माझा साफ करून घेतला पाहिजे एकदा ...!!
--सुजाता.

No comments: