Tuesday, June 7, 2016

माझी पिल्लं

माझी पिल्लं.....
माझी पिल्लं  घरी होती  तेव्हा,....
घरभर पसारा ,....
पुस्तकं-पेनं- सेंटस्-शूज-बॅगज्.....
मला  आवरण्यासाठी .
मी ओरडायची,
दारं नीट लावा,....Responsible व्हा !
आता पिल्लं उडाली भुर्र....
घर माझं  लख्ख,...आवरलेलं.....
त्यांच्यामागे  दार .... घट्ट  लावलेलं ...!
आता मी घेते सुवास ,
त्यांनी  संपवलेल्या  सेंटचा,
भरून  माझ्या रित्या ह्रदयाच्या पोकळीत .....!
पण आयुष्य  असंच असतं ना ,
वाहतं ..... नदीसारखं ....?
आता पिल्लं  बनलीत  Responsible,
त्यांच्या  घरट्यासाठी ,....त्यांच्या पिल्लांसाठी.
आयुष्य असंच असावं ना,....
वाहतं ,..... नदीसारखं ......!!

---सुजाता.

1 comment:

Abhilasha said...

surekh kavita ahe. Sujata ashach chhan kavita karat raha.