"मन आणि शरीर "
शरीर माझं पन्नाशीच्या पलीकडे गेलंय....
मन मात्र अजून, पंचवीशीतच रेंगाळतंय !
पहिल्या पावसाच्या गंधानी, मन फुलारतं....
पण शरीर चिखलाच्या अन् ट्रॅफिकच्या
विचारानीच थबकतं....!
पक्षांच्या किलबिलाटावर, फुलपाखरासंगे
मन माझं नादावतं,
तर, लोकं काय म्हणतील, यावर विचारांनी
शरीर धास्तावतं ।
झाकीरच्या तबल्यावर, किशोरीच्या सुरात
मन गिरक्या घेतं,....
बिच्चारं शरीर मात्र, पावलातच अड़खळतं....
मग मात्र शरीराला मी खुर्चीतच बसवते,
आणि मनाला मुक्त आकाशात भरारी घ्यायला पाठवते !
✍सुजाता.

No comments:
Post a Comment