Monday, February 13, 2017

माझा Valentine Day

माझा  *Valentine Day*....
फक्त माझ्या शब्दाखातर,  माझ्यावर विश्वास दाखवून, जेव्हा माझे मित्रमैत्रिणी  - सगे सोयरे,
माझ्या  सोशल कार्याला भरभरून मदत करतात, त्यासाठी लांबून येतात,  तोच माझ्यासाठी   *Valentine  Day*....!
मी फोन करताच, मला काय सांगायचंय, हे ओळखणा-या  माझ्या  सख्या ह्याच माझ्या  *Valentine*  !!
मी गावाहून आले,की  माझा मुलगा धावत माझ्या जवळ येतो, तो माझा  *Hug Day* ...!
तिला सर्वात आवडणाऱ्या  Dark -Chocolate चा तुकडा जेव्हा माझी लेक मला देते, तोच माझा  *Chocolate Day* !!
आणि  देव पूजेसाठी फुलं तोडताना,  मला आवडणारं एखादं फूल जेव्हा माझा नवरा झाडावरच राहू देतो,  तो खरा माझा  *Rose  Day*  !!
मला वेगळा  Mother's Day  किंवा Sister's  Day  साजरा करायची गरजच भासत नाही.
असे दिवस  माझ्या आयुष्यात  वारंवार येतात.... आणि माझा  रोजच  Happy Day बनवतात.
आणि मला विश्वास देतात की माझा  शेवटचा दिस  सुद्धा  *"गोड़"*च  होणार .....!!!
I wish you alllll, alongव with Myself,  a Happy   *"Every -Day"*  !!💖
✍ सुजाता 🙋

No comments: