कृष्णाचेच दुसरे नाव "सच्चिदानंद"....!
सुख आणि दुःख दोन्ही निरर्थक....
जे मी स्वीकारते ते सुख,
आणि जे मी नाकारते ते दुःख....!
सुख आणि दुःख हे आनंदाचे विभाजक.
आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही ....
जसे "सुख" च्या विरुद्ध "दुःख" ....
"प्रेम" च्या विरुद्ध "द्वेष",
"स्वर्ग" विरुद्ध "नरक" .....
पण "आनंद" च्या विरुद्ध काहीच नाही !
कारण
आनंदाच्या विरुद्ध काही नाहीच...!
"सच्चिदानंद" म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही समावेशक....
आणि "मोक्ष" म्हणजे तरी दुसरे काय "स्वातंत्र्य" ..... किंवा "मुक्तता"....!
मोक्ष म्हणजे सुख आणि दुःख
दोन्हीचा समभाव....
"मोक्ष" म्हणजे कसलाच नाही "अभाव"

No comments:
Post a Comment