एकटेपणा ....आणि एकांत
एकटेपणा या जगातील सगळ्यात मोठी शिक्षा आहे....
आणि एकांत, सगळ्यात मोठे वरदान !
या दोन सारख्या दिसणाऱ्या शब्दांमध्ये आकाश- पाताळाएवढा फरक आहे.
एकटेपणा माणसाला घाबरवतो,....
तर एकांत, श्रांत करतो !
एकटेपणा अस्वस्थता निर्माण करतो,
तर एकांत मनःशांती !
जेव्हा आपण बाहेरच्या जगात बघतो, तेव्हा एकटेपणा जाणवतो,....
पण तीच नजर स्वतः मध्ये वळवतो, तेव्हा एकांत अनुभवतो !
हे जीवन म्हणजे सुद्धा दुसरे तिसरे काही नसून, "एकटेपणातून एकांताकड़े " केलेला प्रवास आहे !
त्या प्रवासातले प्रवासी पण आपण आहोत, आणि अंतीम ध्येय पण आपणच आहोत !!
✍ ओशो

No comments:
Post a Comment