" श्वास "
" श्वासावर लक्ष केंद्रित करा " योगा टीचरनी सांगितलं, आणि माझं लक्ष, श्वासाऐवजी "श्वास"
या शब्दावरच केंदित झालं....
"श्वास" ! जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला अखंड सोबत करणारा, rather, ज्याची सोबत संपल्यावरच मरण येतं, असा, "श्वास" !
जन्मणा-या बाळाने पहिलं "टॅ हॅ" केलं नाही, म्हणजेच श्वास घेतला नाही, तर मोठयातला मोठा Gynecologist सुद्धा पालकांइतकाच धास्तावतो. असा हा श्वास.
असं म्हणतात की माणसाचं आयुष्य हे, वर्ष- महिने यांत न मोजता "अमूक इतके श्वास" असं मोजतात ! म्हणूनतर श्वास रोखून किंवा दीर्घश्वसन करून - श्वास slow करून, योगी आपलं आयुष्यमान वाढवतात.
आपण धावत आलो, किंवा रागावलो, की आपले श्वासोछ्वास जलद होतात, म्हणूनतर १०० आकडे मोजून श्वासावर काबू ठेवायला सांगतात. शवासनात तर आपला श्वास चालू आहे, हे आपल्या स्वतःला सुद्धा जाणवत नाही.
खरंतर अव्याहतपणे, काहीही श्रम न करता, आपल्या ही नकळत, आपला श्वास चालू असतो.
मनुष्य आणि प्राणीच नव्हे, तर वनस्पती सुद्धा श्वासोछ्वास करतात, आणि जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असा प्राणवायू निर्माण करतात., ज्यामुळेच केवळ आपण जिवंत रहातो !
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या श्वासाशिवाय आपण जगू शकणार नाही, तो आपण आयुष्यभर अगदी Free, एकही पैसा खर्च न करता, घेत असतो. जीवन म्हणजे " पाणी" सुद्धा आजकाल विकत घ्यावं लागतंय्, हो कीनई.....?
✍ सुजाता.

No comments:
Post a Comment