Thursday, July 21, 2022

चौकट

घाईघाईने घरातून निघताना 
तिनी विचारलं,
आरशातल्या आपल्याच प्रतिमेला'
"बरी आहेस, ना ?"
कसनुसं हसत प्रतीमा उत्तरली,
"ठीक आहे, पण तेवढी ती 
'चौकट' काढलीस, तर बरं,....
जीव घुसमटतोय, ग....."
धीटपणे ती चौकट काढली तिनं,
अन् ऊत्फुल्लपणे, तिची प्रतिमा आरशांत मावेनाशी झाली......
✍️ सुजाता 💃

No comments: