आत्ता आत्ता तर
सायकल शिकत होतीस तू,
मी मागे धावत होते.....
एवढ्यात कशी तुला,
तुझी गती मिळाली ग....?
आत्ता आत्ता तर माझा हात धरून
एबीसीडी गिरवत होतीस तू,
मी शिकवताना ओरडत होते.....
एवढ्यात कशी तू मोठमोठी
परीक्षा दिलीस गं ?
मी "मंमं" आणेपर्यंत रडणारी तू,
आता तू जेवायला येईपर्यंत
मी वाट बघत बसते,......
आता गाडी चालवतेस तू,
आणि मी मागे बसते....!
तुझ्या डिग्रीच्या फोटोंमध्ये
मीच आनंदून हसते .....!
आयुष्य धावतंय,.... पुढे पुढे पळतंय..
दिवस.... महिने.... वर्ष....
कसं भुर्कन सरतंय.....
एक पर्व संपून नवीन पर्व सुरू होतंय,
आयुष्य असंच असतं, ना, आई....
आता मला पटतंय.....!!
✍️ सुजाता 💕

No comments:
Post a Comment