एकेकाचा कृष्णसखा, प्रत्येकाला भेटतो ....
खोल खोल आत मनाच्या, तोच राहात असतो.
बुद्धी तेथे थांबते, अन विचारही संपतो,
ज्याचा त्याचा कृष्णसखा ज्याला त्याला लाभतो !
मी न शरीर माझे, अहंकारही हा संपतो....
ज्याचा त्याचा कृष्ण सारथी, योग्यवेळी भेटतो !
मी कधीच बद्ध नव्हतो, हे उमगते त्या क्षणी,
कृष्णसखा ज्याक्षणी अंतर्यामी गवसतो.....!!
✍️ सुजाता.

No comments:
Post a Comment