Sunday, June 13, 2021

निसर्ग

कित्ती सुंदर निसर्ग.....
किती भव्य,.... किती विशाल.....
एवढीशी मी, 
त्याहून एवढीश्शी माझी दुःख....
ओंजारत गोंजारत बसले होते...
सगळी गळाली,
निसर्ग कवेत घेता घेता,....
सगळे Problems, सगळे Ego
पुसले गेले,
निळेपणा डोळ्यांत साठवता साठवता !
गर्भरेशमी निळेपणा, लखलखतं आकाश,
चमकतं पाणी, मी वेगळी नाहीच कोणी....
शिवोहम् शिवोहम्.....।।
✍️ सुजाता.

No comments: