Tuesday, May 25, 2021

आशा

आशा .....
आशा उद्याच्या सूर्योदयाची 
विस्तीर्ण आकाशात भरारी घेण्याची 
आशा समुद्राचा तळ गाठून 
रत्न मिळवण्याची..... आशा.....!
आशा भीती पार केल्याची 
उद्याच्या आल्हाददायक भविष्याची....
आशा पक्षांच्या किलबिलण्याची, फुलांच्या गंधाची,
 फुलपाखरांच्या भिरभिरण्याची....
लहानशी नाजुकशी आशा...
काळ्या मातीतून फुटणाऱ्या कोंबासारखी....!
आशा.....
 त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या अस्तित्वाची !
जीवनदायी....आशा !!
😃✍️ सुजाता💕🌹🙏🏻

No comments: