Sunday, February 13, 2022

खरं प्रेम

खरं प्रेम असं असतं....?
खरंच, प्रेम असं असतं....!
क्षणात रुसतं, क्षणात हसतं,....
कधी रागावतं,..... कधी मनावतं.
कधी समजावतं, कधी दटावतं....
खरंच, प्रेम असं असतं.....!
तासंतास बोलत राहतं ,.....
तर कधी काही न बोलताही सारं जाणतं.
प्रेम असतं राधे-कृष्णासारखं, आगळं.... जगावेगळं ......!
सीता-रामासारखं, 
न केलेल्या चूकीची शिक्षा ही
हसत हसत सोसतं !
प्रेम असतं मीरेसारखं, आत्ममग्न भासतं
खरंच, प्रेम असंच असतं ??
खरं प्रेम असंच असतं.....!!
✍ सुजाता

No comments: