Thursday, February 17, 2022

रोजचाच दिस गोड व्हावा

याच साठी केला होता अट्टाहास 
शेवटचा दीस गोड व्हावा |
आयुष्यभर धावले लौकिकाच्या मागे 
लग्न मुलंबाळं संसाराचा गोतावळा....!
आता काढिला यातून पाय वेगळा,
 श्रीहरी माझा पिता- सखा- लडिवाळा !
आता नको वाटे ऐहिकाचे पाश.....
 मायेचा कोष सोडूनि  जावे....!
आता नको अधिकाची हांव, 
समाधानी जीव रहावा
आणिक रोजचाच दिस गोड व्हावा....
           रोजचाच दिस गोड व्हावा.....!!
✍️ सुजाता

No comments: