पावसात मनसोक्त भिजायला हवं,....
इतरांना विसरून, मोठ्ठयांनी गायला हवं,
ङोलणा-या फांदीसंगे नाचायला हवं,
कधीतरी वेड्यासारखं वागायला हवं....!
किरकिर करणा-यांना वगळायला हवं,
Criticize करणा-यांना ओलांङायला हवं....
मुद्दाम दुखवणा-यांना दुर्लक्षायला हवं,
कधीतरी वेड्यासारखं वागायला हवं....!
स्वतःलाच नव्याने शोधायला हवं,
स्वतःवरच प्रेम करायला हवं,....
स्वतः साठी थोडं तरी जगायलाच हवं,
कधीतरी वेड्यासारखं वागायला हवं....!
✍ सुजाता.

No comments:
Post a Comment