Saturday, December 31, 2022

आनंदाचे अत्तर

आनंदाचे अत्तर मी स्वतःवरच उडवले आहे,
त्यामुळे मी जेथे जाईन तेथे 
हा आनंदाचा दरवळ माझ्या भोवती असेल.
कठीण प्रसंगांमध्ये किंवा 
निराश माणसांमध्ये मी असेन,  तरीही
माझ्या 'ऑरा' मध्ये हा आनंदाचा गंध 
सतत माझ्या सभोवती असावा, एवढीच
माझी या नवीन वर्षात पदार्पण करताना
आकांक्षा आणि अपेक्षा.....😊🙏

No comments: