एकवार पाठीवरूनी फिरो तुझा हात....
शेवटचे हे पाऊल माझे, तुझिया घरात....
तुझिया घरात...।
घरामध्ये अवघ्या फिरले, तुझ्या खोलीतही गेले,
कधी भूतकाळी रमले, कधी आठवणींत....
कधी आठवणींत.....।
सगे सोयरे ही सगळे, सारे सारे तुला स्मरती,
तुझ्या विना नव्हते कोणी, माझ्या अंतरात ।
खुळी बावरी मी वेड़ी, येशील का माझ्या स्वप्नी...
सांग कधी तू येशील पुन्हा, माझ्या आयुष्यात ।
एकवार पाठीवरूनी फिरो तुझा हात....
शेवटचे हे पाऊल माझे, अपुल्या घरात...
अपुल्या घरात .....!
-✍सुजाता

No comments:
Post a Comment