जळी स्थळी तुला पाहण्याचा
छंद लागला,.....
तुला शोधण्याचा मी
चंग बांधला.
सत्कर्माचा गर्व झाला,
"मी"पणाचा दंभ लागला,
किती मंदिरे फिरले,
किती तीर्थक्षेत्री डुंबिले,
अंतःकरण ना शुद्ध जाहले,
थकून बसता शोध लागला,
भंवतालच्या निसर्गात, फळाफुलांत
प्राणिमात्रांत, मुलांच्या हास्यात,
श्याम सावळा दिसू लागला....
भेटले, "माझ्यातच" मी "तुला"
भेटले, "माझ्यातच" मी "तुला"....!
✍️ सुजाता.

No comments:
Post a Comment