Wednesday, October 13, 2021

दाता

भंगूदे Ego माझा, 
माज जाऊ दे मनीचा,
येऊदे वाणीत माझ्या,
गोडवा तो जरासा....
तूच कर्ता आणि करविता,
श्रेय घेतो मी, येता जाता,
मागण्याला अंत नाही,
हावरेपणा ही जाईना !
काय मागावे परि मी,
तू सदा दाता रहावे,
देणारा तू, मी काय मागावे,
मी तुझ्यातच लिप्त व्हावे ! 
✍️ सुजाता.

No comments: