Saturday, October 16, 2021

कुंपण

खरं सांगते, हल्ली मला,
घराचं कुंपण टोचतंय्.....
लोकं म्हणतात, हिला
सुख बोचतंय.
डब्यातलं उरलेलं अन्न फेकताना
हात थरथरतो,
रस्त्याकडेच्या भुकेल्या चेहऱ्यांनी
जीव गलबलतो....
हॉटेल चं बील बघून चेहरा पडतो,
आणि नवा दागिना नकोसा वाटतो.
पण मला माहितेय, 
मी किती जणांना पुरणारे,....
सगळ्यांना देण्यासाठी माझ्याकडे
असं कितीसं असणारे....
आणि सगळ्या गरजूंसाठी
कितीसं  उरणारे !
आपण खारीचा वाटा उचलायचा,
थोडं थोडं वाटून,
तृप्तीचा ढेकर द्यायचा !
शेवटी, झोपताना समाधान
वाटलं पाहिजे,....
आपलयाच मनाला सामोरं
जाता आलं पाहिजे...!!
✍️ सुजाता

No comments: