"तुला हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य मी तुला देतो आहे !"
तो कोण तिला स्वातंत्र्य देणारा ....?
त्याने स्वतःचे स्वातंत्र्य काढून तिला दिलं का ?
स्वातंत्र्य असं कधी कुणाला देता येतं का....??
ते तर आपलं स्वतःचं च असतं.....!
प्रत्येकाला ते जन्मतःच मिळालेलं असतं....!
पण प्रत्येकाला स्वतंत्रपणे वागण्याचं धैर्य नसतं.
कारण मग पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडता येत नसतं.
स्वातंत्र्य म्हणजे 'स्वैराचार' नव्हे .....
आपल्याला हवं तसं वागणं नव्हे.....!
स्वातंत्र्याबरोबर आलं पाहिजे 'जबाबदारीचे भान',
स्वातंत्र्य म्हणजे 'आत्मसन्मानाची जाण' !
स्वातंत्र्याचे शिवधनुष्य पेलता आलं पाहिजे,...
म्हणजे आयुष्य 'आत्म तेजाने' झळाळतं !!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment