Tuesday, November 2, 2021

मैत्रीण

कोण म्हणतं मैत्रीण गुरू असू शकत नै ?
ती समजावते, प्रसंगी कानही उपटते,
किती तरी शिकवते, तरी "फी" घेत नै....
कोण म्हणतं मैत्रीण गुरू असू शकत नै ?
खरा गुरू तोच असतो,
जो शिष्याला मार्ग दाखवतो,
कधी ओंजारून- गोंजारून,
तर कधी, फटके मारून.....
वाटेतल्या खाचखळग्यांची जाणीव करून देतो.....!
आता तू लावलंस मला मार्गाला,
अगदी पोचले नसले, तरी,
दिसू लागलीए मंजील....!....
निदान Awareness तरी आलाय...!
✍️ सुजाता.

No comments: