दिव्याच्या वाती सारखं आयुष्य जगावं .....
दिव्याची वात तेलामध्ये आकंठ बुडालेली असते,
पण तिचं टोक मात्र तेलाबाहेरच असतं,
त्यामुळेच तर ती पेटते, उजेड देते .......
तेलात पूर्णपणे बुडालेली वात कशी बरं प्रकाश देईल ?
मला वाटतं आपणही तसंच जगावं.....
बाहेरच्या जगात कितीही गुंतलो,
तरी मनातून मात्र थोडं अलिप्तच असावं.
मग बघा आपलं आयुष्य कसं उजळेल..... आणि आपण इतरांची आयुष्यही उजळवून टाकू....!
एक दिवा सनेहाचा, आपल्या हृदयात,....
एक दिवा सहानुभूतीचा - इतरांबद्दल च्या....!
एक दिवा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा....!
एक दिवा कृतज्ञतेचा....
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment