नजर जाईल तिथवर पाणीच पाणी.....
या शांत वेळी, आठवतेय जीवनाची कहाणी.
ओठांवर अवीट गाणी,.....
आणी ह्रदयात माझ्या "चक्रपाणी".....!
कुठे घेऊन चाललीए, ही क्रूज.... माहिती नाही....
कुठे वळणार, कुठे थांबणार, कधी परतणार....
काहीच माहिती नाही.....
सहप्रवासी, काही ओळखीचे, काही अनोळखी,
सारे घडीभराचे साथी !
पण आवडतोय हा प्रवास,.... आयुष्यासारखाच ....
स्वतः लाच भेटवणारा....
स्वतः शी नव्याने ओळख करून देणारा....!!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment