आयुष्याच्या या वळणावरचा
*वाढदिवस* ......
आठवत नाही मला, माझा पहिला वाढदिवस.....
पण त्यापुढचे माझे सगळे वाढदिवस
आहेत अगदी खासम् खास !
लक्षात राहण्यासारखे, म्हणजे शाळेतले वाढदिवस.
बिल्डिंग मधल्या आणि वर्गातल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना
घरी बोलावून कापलेला केक आणि वेफर्स ....
न मागता मिळालेला फ्रॉक अन् बाहुली.....
आनंदाची जणू परमावधी !
नंतरचे वाढदिवस, म्हणजे घरून पैसे नेऊन, मैत्रिणींबरोबर खाल्लेली भेळ आणि उसाचा रस.
कमावती झाल्यानंतर, स्वखर्चाने ऑफिस मध्ये
दिलेली पार्टी आणि साजरे केलेले वाढदिवस....!
लग्नानंतरचे मंतरलेले दिवस.....
दागिना आणि साडी यांचे सरप्राईज.....
आवडते चायनीज जेवण आणि
वाढदिवसाचे सेलिब्रेशन.....!
भराभर उडू लागले दिवस.....
आणि सुरु झाले मुलांचे वाढदिवस.....
नंतर आला खास वाढदिवस....
लेकीने "स्वहस्ते* बनवलेला केक
जणू, याचसाठी केला होता अट्टाहास,
आनंदात साजरे व्हावेत, सारे वाढदिवस.....!
आता आयुष्याच्या या वळणावरचा *वाढदिवस* .... लेकीने दूर देशाहून *ऑनलाईन* पाठवलेला केक,
खास मैत्रिणींनी अचानक दिलेले "जेवण" आणि
सातासमुद्रापारच्या जिवलगांनी काढलेली
"बालपणीची आठवण".....!
पाठीशी असाव्यात आपल्या माणसांच्या *सदिच्छा* हीच आता परमेश्वराजवळ मनापासून *इच्छा* !
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment